लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

महापालिकेचे थकबाकीधारकांना नोटीस बजावण्याचे आदेश

-जवळपास तेरा हजार थकबाकीदारांना दिल्या नोटीस.

पिंपरी | लोकवार्ता-

पिंपरी-चिंचवड शहरात एकूण साडेपाच लाख मालमत्ता असून एक लाखापेक्षा जास्त मालमत्ताकर असलेल्यामध्ये 27 हजार 714 मोठ्या थकबाकीधारकांचा समावेश आहे. . महापालिका करसंकलन विभागाने सुमारे 13 हजार मालमत्ताधारकांना कराचा भरणा करण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत.औद्योगिकसह निवासी आणि बिगरनिवासी मालमत्तांचा समावेश आहेकोरोनामुळे महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्याचा परिणाम अर्थसंकल्पावर पाहायला मिळाला आहे. तसेच याचा परिणाम विकासकामांवर होणार आहे. उत्पन्न वाढीसाठी करसंकलन विभागाला करवसुलीचे टार्गेट दिले आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत जास्तीत जास्त कर वसुली अभिप्रेत आहे. करसंकलन विभागामार्फत थकबाकी वसुलीसाठी मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे.

करसंकलन विभागाकडील आकडेवारीनुसार एक लाखापेक्षा अधिक मालमत्ताकर असलेल्या मालमत्ताधारकांची संख्या 27 हजार 714 इतकी आहे. त्यामध्ये एक ते पाच लाख रुपयांपर्यंत मालमत्ताकर थकबाकीदारांची संख्या 20 हजार 561 इतकी आहे. त्यामध्ये निवासी मालमत्ताधारक 10 हजार 600, औद्योगिक 6 हजार 618 आणि मिश्र 3 हजार 343 थकबाकीदारांचा समावेश आहे. पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांची संख्या 4 हजार 153 इतकी आहे. त्यामध्ये निवासी 1 हजार 279, बिगरनिवासी 1 हजार 612, मिश्र 929 आणि औद्योगिक 333 मालमत्तांचा समावेश आहे. त्यांच्याकडून थकबाकी मालमत्ताकर वसुलीचे आव्हान करसंकलन विभागापुढे आहे.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani