लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

अनधिकृत बांधकामावरमहापालिकेची धडक कारवाई

लोकवार्ता : पिंपरी-चिंचवड महापालिका क क्षेत्रीय कार्यालय, अतिक्रमण पथकाच्या मार्फत कुदळवाडी, चिखली रस्त्यालगतच्या गट क्र. 16, 17 व18 मधील डी.पी.रोडच्या बाधीत क्षेत्रामध्ये येणा-या मोई फाटा गट क्र. 28 मधील सुमारे 65 हजार चौरस फुट क्षेत्रावरील अनधिकृत व्यावसायिक पत्राशेड बांधकामावर अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली.

अनधिकृत

महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे , उपअभियंता सुर्यकांत मोहिते, कनिष्ठ अभियंता संदिप वैद्य व अतिक्रमण पथक प्रमुख संतोष शिरसाठ , बीट निरिक्षक योगेश शेवलकर, साधना ठोंबरे, यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. कुदळवाडी, चिखली गट क्र.16,17 व18 मधील गट क्र.197 व198 देहू – आंळदी रस्त्यावरील व मोई फाटा गट क्र.218 एकूण 4उ अनधिकृत व्यावसायिक पत्रादोड / बांधकामाना महापालिकेमार्फत नोटीस देण्यात आल्या होत्या.

त्यापैकी 13 व्यावसायिक प्त्राशोड / बांधकामे ही संबधितांनी स्वताःहून काढून घेतली. उर्वरीत 30 अनधिकृत व्यावसायिक पत्राशेड / बांधकामावर अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली. या कारवाईत क क्षेत्रीय अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस पथक सहभागी झाले होते. ((01)९03॥ 116७४5) दररोज शहराच्या विविध भागात अतिक्रमण कारवाई केली जात आहे. नागरिकांनी रस्त्यावर अनधिकृत टप-या व शेड उभारु नये. तसेच फुटपाथ स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे, आयुक्त यांच्या निर्देशनानुसार सदर कारवाई केलेल्या ठिकाणी महापालिका परवानगी. घेतल्याशिवाय अनधिकृत पत्राशोड / बांधकाम करु नये, अशा संदेशाचे फलक लावण्यात आले आहे.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani