महापालिकेची ‘पे अँड पार्क’ योजना गुंडाळली
लोकवार्ता : मोठा गाजावाजा करीत पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात सुरु केलेली ‘पे अँड पार्क’ योजना बारळगली आहे. परवडत नसल्याचे कारण देत या कामाच्या ठेकेदाराने माघार घेतली आहे. महापालिकेच्या तिजोरीमध्ये भर पडावी, यासाठी वेगवेगळ्या योजना लागू करण्यात येत आहेत. त्यातील एक भाग म्हणजे शहरात ‘पे अँड पार्क’ योजना’ लागू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

शहरातील 396 ठिकाणी ‘पे अँड पार्क’ करण्याची तयारी महापालिकेने केली. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात 80 ठिकाणी ‘पे अॅण्ड पार्क’ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. ‘पे अँड पार्क’साठी आवश्यक असलेले पट्टे रस्त्यावर मारण्यात आले. काही ठिकाणी लोखंडी बॅरिकेड्स उभारण्यात आले. ‘पे अॅण्ड पार्क’ असल्याची वाहन चालकांना माहिती व्हावी, यासाठी ठिकठिकाणी फलकही उभारण्यात आले.
शिवबा प्रतिष्ठान व अक्षय माछरे फाउंडेशन आयोजित नवरात्रोत्सवाला दिमाखात सुरवात..!
याबाबत निविदाही मागविण्यात आल्या. मात्र, या निविदांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. आलेल्या ठेकेदारांपैकी निर्मला ऑटो केअर या संस्थेला ‘पे अँड पार्क’चे काम देण्यात आले. मात्र गेल्या सहा महिन्यांतील उत्पन्न आणि कर्मचारी वर्गावर होणारा खर्च पाहता ‘पे अँड पार्क’ चे काम आपल्याला परवडत नाही. आपण यातून माघार घेत असल्याचे पत्र निर्मला ऑटो केअर या कंपनीने महापालिकेला दिले आहे, तर काही ठिकाणचे ‘पे अँड पार्क’ यापूर्वीच ठेकेदाराने बंद केले आहे.
शहरात 396 ठिकाणी ‘पे अँड पार्क’ करण्याचे महापालिकेचे नियोजन. पहिल्या टप्प्यात शहरातील 80 ठिकाणी ‘पे अँड पार्क’ करण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात 20 ठिकाणीच ‘पे अँड पार्क’च्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. कडक अंमलबजावणीसाठी वाहतूक पोलिसांना पाच टोईंग व्हॅन दिल्या होत्या. तरीही योजना बारगळली आहे.