महापालिका निवडणुका फेब्रुवारीतच!
मानदार याद्या बुलाणीकराणाच्या कामास प्रारंभ

लोकवार्ता।प्रतिनिधी
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका फेब्रुवारी २०२२ मध्येच होणारहे आता निश्चित झाले असून राज्य निवडणुक आयोगाने शहरातील मतदार याद्या नुतणीकरणाच्या कामास सुरुवात केली आहे.

गेली अनेक दिवस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भात उलट सुलट चर्चा चालू होती. या निवडणुका सहा महिणे पुढे जाणार असे तर्कही लावले जात होते.
पिंपरी चिंचवड शहरांत अनेक जण निवडणुक लढविण्यास इच्छुक असतानाही केवळ निवडणुका केंव्हा होणार याची खात्री नसल्याने ते वेट अॅण्ड वॉचच्या भुमीकेत होते. मात्र निवडणुक आयोगाने मतदार याद्या नुतणीकरणाचा कार्यक्रम हाती घेतल्याने महापालिका निवडणुका वेळेतच म्हणजे फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्याचे मुख्य निवडणुक आयुक्तांनी पत्र क्र. ईएलआर २०२० / प्र.क्र . ३ ९ ५ / २० / ३३ नुसार मतदार यादीचे विषेश संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे आदेश दिले असून या पत्रानुसार मा . जिल्हाधिकारी पुणे यांनी पत्र क्र . पीईई – ३-४३० / २०२१ दि. १६/०६/२०२१ अन्वये या मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षणाचे आदेश दिले आहेत.
यासंदर्भात मतदार नोंदणी अधिकारी, २०६ पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकार यांनी आज पत्रक प्रसिद्ध केले असून मतदार याद्यांचे अद्ययावातीकरणाचा कार्यक्रम जाहिर केला आहे. या पत्रकात म्हंटले आहे की, पिंपरी विधानसभा मतदार संघातील एकुण ३९९ यादी भागातील १८२५६ मतदारांची छायाचित्रे यादीमध्ये दिसून येत नाहीत. ज्यांची छायाचित्रे यादीत नाहीत अशा मतदारांनी आठ दिवसांत आपली छायाचित्रे २०६, पिंपरी विधानसभा मतदार संघ कार्यालय हेडगेवार भवन, से. क्र. २६ प्राधिकरण निगडी ४११०४४ येथे रहिवाशी पुराव्यासह जमा करावयाची आहेत. ज्यांची छायाचित्रे मुदतीत जमा होणार नाहीत अशा मतदारांची नांवे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत.
या मतदार याद्या मा. मुख्य निवडणुक अधिकारी महाराष्ट्र राज्य, मा. जिल्हाधिकार पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वेबसाईटवर पहाण्यासाठी उपलब्ध असल्याचेही या प्रसिद्धी पत्रकांत नमूद करण्यात आले आहे.