“महापालिका निवडणूक पुढे जाण्याची शक्यता”
पिंपरी |लोकवार्ता-
ज्या व्यक्तीचे वय १८ किंवा त्यापेक्षा अधिक असेल त्यांना ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे. पुनरीक्षण कार्यक्रमा अंतर्गत नागरिकांना मतदार नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करता येणार आहे.पुनरीक्षण कार्यक्रमाला, अन ओघाने मतदार यादीला महत्व आहे. यंदाच्या नोव्हेंबरमध्ये दिवाळी आहे आणि विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमसुध्दा. हे औचित्य साधून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने यंदा लोकशाही दीपावली स्पर्धा आयोजित केली आहे.

मतदार याद्यांच्या अद्ययावती करणासाठी आणि मतदार नोंदणीचा नवीन दिनांक जाहीर करण्यासाठी भारत निवडणूक आयोग दरवर्षी पुनरीक्षण कार्यक्रम राबवत असते. यंदा हा कार्यक्रम १ नोव्हेंबर त ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत राबवला जाणार आहे. १ नोव्हेंबर २०२१ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच सर्व मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारुप मतदार यादी प्रकाशित केली जाईल. महत्वाचं म्हणजे, या कार्यक्रमांतर्गत १८ किवा अधिक वय असलेले नागरिक मतदार यादीत आपलं नाव नोंदवू शकतील. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची अधिक माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर पाहता येईल.
आगामी महानगरपालिका निवडणूकीसाठी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम १ नोव्हेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ दरम्यान घेण्यात येणार असून त्यामध्ये मतदार नोंदणी करता येणार असल्याची माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.