नुपूर शर्माच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुस्लिम समाज आक्रमक
देशभरात मुस्लिम बांधवांच्या आक्रमक भूमिका..पोलिसांना अलर्ट राहण्याचे आदेश.
पुणे । महाराष्ट्र
प्रेषित महम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना अटक करा या मागणीसाठी देशाच्या विविध भागात मुस्लिम सामाजाकडून निदर्शने करण्यात येत आहेत. याच्या आधी नुपूर शर्मा त्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात दिल्लीतील जामा मशिदीत निदर्शने करण्यात आली. मुस्लीम समाजातील लोकांनी शुक्रवारच्या नमाजनंतर ही निदर्शने केली आहे. तसेच आंदोलकांनी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यांना निलंबित करणे किंवा भाजपमधून बडतर्फ करणे इतकेच पुरेसे नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता या वादाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटताना दिसत आहेत. आज नुपूर शर्मा त्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात सोलापूरमध्ये आंदोलन करण्यात आले. •ज्यात मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता.

प्रेषित महम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात देशासह विदेशातही नाराजी दिसत आहे. याच्याआधी मुस्लिम राष्ट्रांनी नुपूर शर्मा च्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला होता. त्यानंतर आता याचे पडसाद देशातील विविध भागात बघायला मिळत आहेत. तर देशातील जामा मशिदीपासून ते कोलकाता आणि यूपीच्या अनेक शहरांमध्ये उग्र निदर्शने होताना दिसत आहेत. तसेच यूपीची राजधानी लखनऊशिवाय देवबंद, प्रयागराज आणि सहारनपूरमध्येही नुपूरच्या अटकेच्या मागणीसाठी लोक रस्त्यावर उतरत आहेत. असेच लोक राज्यातील सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, नवी मुंबई मध्ये लोक रस्त्यावर उतरले आहे. लोकांचा रोष पाहायला मिळत आहे. तर मुस्लिम समाजाकडून नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.