माझ्या मुलाने मुलींना डेट करावे, ड्रग्स घ्यावे आणि सेक्सही करावा !
शाहरुखचे ‘ते’ स्वप्न मुलाने पूर्ण केले

लोकवार्ता । प्रतिनिधी
माझा मुलगा आर्यन जेव्हा मोठा होईल तेव्हा माझी अशी इच्छा आहे की, ज्या गोष्टी मी तरुणपणी करु शकलो नाही त्या गोष्टींचा त्याने अनुभव घ्यावा. आर्यनने मुलींना डेट करावे, ड्रग्स आणि सेक्सचाही अनुभव घ्यावा. त्याने एक बॅड बॉय व्हावे तो जर गूड बॉय झाला तर मीच त्याला घराबाहेर काढेन ही मुक्ताफळे बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानने एका मुलाखतीवेळी उधळली होती. आज खरंच शाहरुख खानची ती इच्छा त्याच्या मुलाने पूर्ण केली आहे, अशी चर्चा बॉलीवूड वर्तुळात रंगली आहे.
आर्यन खानची ड्रग्स प्रकरणी चौकशी सुरु झाली आणि शाहरुख खानची मुलाखत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वर्ष होते १९९७. अभिनेत्री सिमी ग्रेवालच्या टॉक शोमध्ये शाहरुख खानने हजेरी लावली होती. त्यावेळी सिमी ग्रेवालचा टॉक शो हा बिनधास्त चर्चेसाठी प्रसिद्ध होता. बॉलीवूड सेलिब्रेटी या शोला हजेरी लावत आणि मनमोकळेपणे संवाद साधत. त्यामुळे हा शो आणि त्यावेळी बॉलीवूड कलाकारांनी केलेली विधान चर्चेत असत. सिमी ग्रेवाल टॉक शोमध्ये शाहरुख खानने पत्नी गौरी खानसोबत हजेरी लावली होती. यावेळी शाहरुखने दिलेली मुलाखत भलतीच गाजली होती.
कारणही तसेच होते. शाहरुखला नुकताच मुलगा झाला होता. सिमी ग्रेवालने शाहरुख खानला आर्यन खान बाबत विचारले होते. यावेळी हसत हसत शाहरुख म्हणाला होता की, माझा मुलगा आर्यन जेव्हा मोठा होईल तेव्हा माझी अशी इच्छा आहे की, ज्या गोष्टी मी तरुणपणी करु शकलो नाही त्या गोष्टींचा त्याने अनुभव घ्यावा. आर्यन याने मुलींना डेट करावे, ड्रग्स आणि सेक्सचाही अनुभव घ्यावा. त्याने एक बॅड बॉय व्हावे तो जर गूड बॉय झाला तर मीच त्याला घराबाहेर काढेन. तसेच माझी एक इच्छा आहे की, आर्यन याने मुलींना त्रास द्यावा. मुलींच्या आई-वडिलांनी त्याची तक्ररा घेवून माझ्याकडे आले पाहिजे, असेही त्यावेळी शाहरुख खान याने म्हटले होते.
शाहरुखचे ‘ते’ स्वप्न मुलाने पूर्ण केले का ?
आर्यनचा जन्म झाला होता त्यावेळी शाहरुख खानने सिमी ग्रेवाल टॉक शोमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी त्याने ज्या गोष्टी मी तरुणपणी करु शकलो नाही त्या गोष्टींचा अनुभव आर्यन याने घ्यावा, असे म्हटले होते. आता ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खान याची एनसीबी चौकशी करत आहे. त्यामुळे शाहरुख खानची ती जुनी मुलाखत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आज शाहरुख खानचे स्वप्न पूर्ण झ्राले का, अशी चर्चेही बॉलीवूडमध्ये रंगली आहे.