तुमच्या प्रभागात नामफलक लावताय..जरा जपून.. होऊ शकते कारवाई
-महापालिका इन ऍक्शन मोड.
पिंपरी| लोकवार्ता
शहर कोणतेही असो तिथे नगरसेवकांचे नामफलक असतेच. नगरसेवक प्रभाग निधीमधून विविध विकास कामे करतात. त्यामध्ये रस्ते, उद्याने, स्मारके, चौक यावर नगरसेवक स्वत: चे नाव अत्यंत मोठ्या अक्षरामध्ये लिहितात. जर एखादे स्मारक थोर व्यक्तीचे असेल तर ज्याचे स्मारक आहे त्याच्या नावापेक्षाही मोठे नाव हे नगरसेवकाचेच असते. हे सर्व नगरसेवक विकास कामांचे श्रेय घेण्यासाठी करतात. इतकेच काय तर काही माननीय लोक प्रभागातील विकास कामांवर परस्पर कुठलाही ठराव मंजूर न करता आपल्या नातेवाईकांची नाव टाकून मोकळी होतात. नियमानुसार कोणत्याही प्रभागातील विकास कामाला एखाद्या व्यक्तीचे नाव द्यायचे असेल तर सर्वात अगोदर महापालिकेच्या सभेमध्ये विषय ठेवावा लागतो. त्यानंतर संपूर्ण सभाग्रहाची मान्यता घेऊनच नाव देता येते. मात्र, अनेक नगरसेवक आपल्या नातेवाईकांची नावे देण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसून थेट नावे देऊन टाकतात.

जवळपास सर्वच नगरसेवक आपल्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात नामफलक जागोजागी लावतात. नगरसेवक नामफलकावर स्वतःचे नाव मोठ्या अक्षरामध्ये टाकतात. मात्र, आता या नामफलकासाठी महापालिकेकडून एक कडक नियमावली तयार केली जाणार आहे. आपल्या सोईनुसार नगरसेवक नामफलक तयार करून घेतात. मात्र, अशा नगरसेवकांवर कोण कारवाई करणार हा मोठ्या प्रश्न उपस्थित होतो. यासंदर्भात थोडी उशीरा तरी पुणे महापालिकेला जाग आलीये. आता यावर पुणे महापालिकेने महत्वाची पाऊले उचलत नाव नेमके कसे असावे, नामफलकाचा रंग, आकार यासाठी खास नियमावलीच करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे पुढील आठवड्यामध्येच हे सर्व तयार केले जाणार आहे.