पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी देण्यात येणार डिझायनर ”तुकाराम पगडी”
लोकवार्ता : जगद्गुरू संत तुकाराम महाराज मूर्ती आणि शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी येत्या १४ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. त्याच्या स्वागताची जय्यत तयारी झाली असून देहू संस्थनामार्फत त्यांच्यासाठी दोन डिझायनर तुकाराम पगड्या आणि उपरणे तयार करण्यात येत आहेत. पुण्यातील मुरुड झेंडेवाले यांच्याकडे ही पगडी आणि उपरणे तयार करण्याचे काम सुरु आहे.

मोदींसाठी तयार करण्यात येणाऱ्या उपरण्यावर अभंग लिहले जात आहेत. हे अभंग हस्तलिखित असून हिंदी भाषेतही काही अभंगाचे लिखाण केले जात आहे. पंतप्रधानांसाठी तयार करण्यात आलेल्या पगडीला १०-१२ मीटर रेशमी कापड वापरण्यात आलं आहे. या पागडीची सजावट तुळशीच्या माळांनी करण्यात आली आहे. तसेच या पागडीसोबत टाळ आणि चिपळ्या देण्यात येणार आहेत.