भाजपचे शिवराज लांडगे यांचा पुढाकाराने इंद्रायणीनगर येथे वृक्षारोपण..!
वड, पिंपळ, कडुलिंब गुलमोहर आदी देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे

लोकवार्ता।प्रतिनिधी
पिंपरी : इंद्रायणीनगरमध्ये नव्याने विकसित करण्यात आलेल्या रस्त्याच्या दुतर्फा आता महापालिका प्रशासन देशी झाडांची लागवड करणार आहे. त्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष शिवराज लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे.

याबाबत शिवराज लांडगे यांनी महापालिका उपयुक्त उद्यान विभागाचे प्रमुख सुभाष इंगळे व उद्यान निरीक्षक गोसावी यांची भेट घेतली
इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक ८ या ठिकाणी गेल्यावर्षी महापालिका प्रशासनाने वृक्षारोपणासाठी खड्डे व मातीची व्यवस्था केली आहे. यशवंतनगर चौकापासून मटेरियल गेट ते स्पाईन रोड, टेल्को रोड इंद्रायणीनगर कॉर्नर ते इंद्रायणीनगर चौक, गवळीमाथा चौक ते स्पाईन रोड, इंद्रायणीनगर चौकापासून वेलमेड कंपनी एम. आय. डी. सी. एस ब्लॉक ते इलेक्ट्रॉनिक सदन चौक व इंद्राणीनगर तिरुपती चौक ते पुणे-नाशिक महामार्ग या ठिकाणी वृक्षारोपण करणे अपेक्षीत आहे. अशी भूमिका भाजयुमो शहर उपाध्यक्ष शिवराज लांडगे यानी माडली. याबाबत आम्ही नोल्या वर्षभरापासून पाठपुरावा करीत आहोत. असेही लांडगे यांनी म्हटले आहे.
उद्यान विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे म्हणाले की, इंद्रायणीनगरमधील संबंधित रस्त्यांच्या दुतर्फा तसेच रस्ता दुभाजकामध्ये वड, पिंपळ, कडुलिंब गुलमोहर आदी देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात नियोजन करण्यात येईल.