इंद्रायणी फाउंडेशन यांच्या मार्फत नवदुर्गा सन्मान सोहळा थाटात संपन्न
नवरात्रीचे औचित्य साधून इंद्रायणी सोशल फाउंडेशन आयोजित नवदुर्गा सन्मान २०२२ सोहळा नुकताच पार पडला.
पिंपरी । लोकवार्ता
त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा सन्मान करणे त्यांचे कार्य समाजातील तळागाळापर्यंत पोहोचावे तसेच आपल्या आजूबाजूला अनेक महिला आपला घर संसार सांभाळून कौतुकास्पद कार्य करत असतात घर सांभाळून समाजासाठी काही तरी करण्याची त्यांची ही धडपड पाहून त्यांना सन्मानित करावे ही कल्पना सुचली आणि त्यातून या महिलांची निवड करण्यात आलीअसे मनोगत इंद्रायणी फाउंडेशनच्या अध्यक्षा अनिता ताई डफळ यांनी व्यक्त केले.
त्या प्रसंगी सचिव राणीताई बहिरट , खजिनदार मोनिकाताई गव्हाळे, उपाध्यक्ष शुभांगी ताई भूमकर सह खजिनदार कामिनीताई खरात , संचालक मयुरी ताई राऊत आणि शुभांगी ताई काळे यांनी खूप अतिशय चांगलं नियोजन करून नवदुर्गांना सन्मानित केलं प्रमुख अतिथी सुनील हिरूरकर सहाय्यक पोलीस महानिरीक्षक एम टी महाराष्ट्र पुणे सामाजिक कार्यकर्ता तृप्तीताई रामाने , अश्विनीताई टेंभरे , विजयाताई अल्हाट ,नगरसेविका विनयाताई तापकीर ,अर्चनाताई सस्ते ,आशाताई इंगळे , शिल्पाताई शेलार आणि चिंबळी गावचे आदर्श व्यक्तिमत्व इंद्रायणी फाउंडेशन ला नेहमीच मदत करणारे सत्यवान मामा बटवाल यांची उपस्थिती होती .

चिंबळी गावच्या महिलांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला भव्य डान्स स्पर्धा राज दांडिया आणि गरबा हा महिलांसाठी उपक्रम राबविण्यात आले.त्याप्रसंगी स्वीय सहाय्यक, विशेष पोलीस महानिरिक्षक , एम टी महाराष्ट्र राज्य पुणे सुनील हीरुरकर यांनी महिलांच्या काही तक्रारी असतील तर न घाबरता कुठल्या हेल्पलाइनवर कॉल करून कसे सांगायचे याचे उत्तम मार्गदर्शन केले.