“असल्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही…”
किरीट सोमय्यांच्या वक्तव्यावर नवाब मालिकांचं उत्तर.
पिंपरी| लोकवार्ता-
“सध्या दिवाळी सण येतोय, दिवाळीत फटाके फोडतात. मात्र, किरीट सोमय्या दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. एक, दोन, तीन, चार किंवा पाच नाही तर पूर्ण अर्धा डझन लोकांचे फटाके फोडणार आहे.त्यांनी (राष्ट्रवादीने आर्यन खान प्रकरणात) लवंगी फटाके फोडले, मात्र मी एकदम बॉम्ब फोडणार आहे, असाही सोमय्यांनी दावा केला.

आता याच वक्त्यव्यावर नवाब मलिक यांनी किरीट सोमय्याना चांगलंच टोला लगावलाय .किरीट सोमय्या घोटाळे उघड करण्याची पोकळ धमकी देत असल्याचा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही. आगामी अधिवेशनात मीच भाजपचे पुराव्यासकट घोटाळे उघड करणार आहे, असं मलिक म्हणाले आहेत. “पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही. मी विधानसभेमध्ये जे प्रकरण समोर आणणार आहे त्यानंतर भाजपा कार्यकर्ते जनतेसमोर जाऊ शकणार नाही हे मी आज पुन्हा एकदा सांगतो,” असं मलिक यांनी म्हटलं आहे.