“चलो आज BJP और ड्रग्स पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है-नवाब मलिक”
राज्यांचे अल्पसंख्यानक मंत्री नवाब मलिक यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गंभीर टीका केली आहे.
पिंपरी| लोकवार्ता-
नवाब मलिकांनी लागोपाठ अनेक खुलासे वानखेडे आणि भाजपविरोधात केले आहेत. एका ड्रग्ज पेडलरचा फोटो ट्विट करत नवाब मलिकांनी हा व्यक्ती कोण ? असा सवाल केला आहे. मी एनसीबीच्या कारवाईविरोधात नाही परंतु बोगस कारवाई आणि वसुलीच्या विरोधात असल्याचे नवाब मलिकांनी सांगितले आहे. तर समीर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात अनेक खुलासे नवाब मलिकांनी केला आहे.

नवाब मलिक आणखी एक खुलासा करण्याच्या तय्यारी मध्ये दिसत आहेत.
नवाब मलिकांनी मागील काही दिवसामध्ये अनेक गौप्यस्फोट केले आहेत, तर आज भाजप आणि ड्रग्ज पेडलरचा संबंध काय याबाबत चर्चा करुया असं ट्विट नवाब मालिकांनी केल आहे
एका अज्ञात व्यक्तीचा फोटो ट्विट करत मंत्री नवाब मलिक यांनी हा व्यक्ती कोण आहे? असा सवाल केला आहे. दरम्यान राजकीय विश्लेषक निषांत वर्मा यांनीसुद्धा या व्यकीचा फोटो ट्विट केला असून यामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस दिसत आहेत. फोटोतील व्यक्ती हा ड्रग्ज पेडलर असून अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटो असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे.दरम्यान नवाब मलिकांनी ट्विट केलेला फोटो हा ड्रग्ज पेडलर जयदीप राणा याचा आहे. राजकीय विश्लेषक निशांत वर्मा यांनीसुद्धा हा फोटो ट्विट केला आहे .
फोटोमधील ती व्यक्ती आहे तरी कोण ?
फोटोतील व्यक्ती जयदीप चंदूलाल राणा असून त्याला एनसीबीने जून २०२१ रोजी एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. राणा सध्या तुरुंगात आहे. अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटो असल्यामुळे त्याचे आणि भाजपचा संबंध काय? असा सवाल वर्मा यांनी उपस्थित केला आहे.