एस टी भाडेवाडी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस चे निषेध आंदोलन.
दिवाळीच्या तोंडावर वाढलेली महागाई विरोधात पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस चा विरोध.
पिंपरी । लोकवार्ता
ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या एसटी ची दरवाढ केल्यामुळे पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने आज पिंपरी येथे राज्यशासनाच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.
केंद्र आणि सध्याच्या राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आधीच सर्वसामान्य नागरिकांना महागाईची प्रचंड झळ सोसावी लागत आहे, त्यातच आता ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारने एस टी ची भाडेवाढ जाहीर केल्याने सरकार सर्वसामान्य नागरिकांचा कसलाही विचार करत नसल्याचे स्पष्ट होते. म्हणूनच आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने हे निषेध आंदोलन वल्लभनगर एस टी डेपो या ठिकाणी करण्यात आले, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री. अजितभाऊ गव्हाणे, राष्ट्रवादी च्या महिला अध्यक्षा कविताताई आल्हाट, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष इम्रानभाई शेख, राष्ट्रवादी महिला काँग्रेस क्रीडा सेल च्या अध्यक्षा सौ. समीताताई गोरे, चिंचवड विधानसभा adhyaksh सौ संगिता कोकणे , Mukhya संघटिका मीरा कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्त उपस्थित होते.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे म्हणाले कि, सर्वसामान्य नागरिकांना त्रासदायक अशी एस टी भाडेवाढ करणाऱ्या राज्यसरकारचा जाहीर निषेध करत असताना ही दरवाढ रद्द करावी अशी आमची मागणी आहे अन्यथा महाराष्ट्रभरात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळी त्यांनी दिला. महिला शहाराध्यक्षा कविताताई आल्हाट यांनी यावेळी राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करत सांगितले की राज्यात बेरोजगारी, महागाई, शिक्षक भरती घोटाळा असे असंख्य प्रश्न आहेत त्यात ऐन दिवाळी च्या तोंडावर एस टी भाडेवाढ करून या सरकारने सर्वसामान्य नागरिकाना त्रास देण्याचे काम केले आहे, ज्या एस टी कर्मचाऱ्यांनी शरद पवार साहेबांच्या घरावर हल्ला केला त्यांच्याप्रती सहानुभूती दाखवत या सरकारने त्यांना पुन्हा सेवेत घेतले पण एस टी भाडेवाढ करून सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या विरुद्ध निर्णय घेतले अशा जाचक शासनाचा तीव्र निषेध त्यांनी यावेळी व्यक्त केला, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष इम्रानभाई शेख यांनी सर्वसामान्य नागरिक ज्या एस टीने प्रवास करतात त्याच्या तिकीतदरात दहा टक्के वाढ करण्याचा शासनाच्या आदेशाचा निषेध व्यक्त केला, ऐन सणासुदीच्या तोंडावर खाजगी वाहनचालक बेकायदेशीरपणे दुप्पट तिप्पट दरवाढ करत आहेत त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित असताना हे जनतेच्या हिताविरुद्ध काम करणारे सरकार नागरिकांना वेठीस धरण्याचे काम करत आहे असे सांगितले, एस टी ची भाडेवाढ तात्काळ रद्द न केल्यास राज्यभरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस तीव्र आंदोलन उभारेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. महिला क्रीडा सेल शहराध्यक्षा समिता ताई गोरे यांनी यावेळी सांगीतले की, एस टी च्या तिकीतदारात हंगामी भाडेवाढ या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा सरकारने काढणे गरजेचे आहे, सध्या ज्या बसेस पेट्रोल डिझेल वर धावत आहेत, त्या त्वरित बदलून त्या ऐवजी इलेक्ट्रिक बसेस तसेच सीएनजी बसेस उपलब्ध करून दिल्यास मोठ्या प्रमाणात खर्च कपात होऊन नागरिकांना परवडेल अशा दरात आधुनिक बसेस उपलब्ध होतील त्या दृष्टीने शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी केली.