लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

राष्ट्रवादी युवकची मनपा निवडणूकपुर्व आढावा बैठक संपन्न

महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा -रविकांत वरपे

पिंपरी | लोकवार्ता-

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली 2017 ते 2021 या कालावधीत युवक कॉंग्रेसचे उत्कृष्ट काम झाले आहे. महानगरपालिकेतील भाजपच्या भ्रष्टाचारी राजवटीचा पर्दाफाश वेळोवेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने केला आहे. आता यात अधिक आक्रमकपणा आणि सातत्य ठेवून 2022 च्या सार्वत्रिक निवडणूकांना पुर्ण क्षमतेने सामोरे जाऊन महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी केले.

बुधवारी (दि. 8 डिसेंबर) राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या खराळवाडी पिंपरी येथिल कार्यालयात शहर युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या अध्यक्षतेखाली 2022 च्या निवडणुकीच्या तयारीसाठी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, राष्ट्रवादी कॉंग्रेस युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, युवक प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, संदीप लाला चिंचवडे, प्रशांत सपकाळ, शहर प्रवक्ते फझल शेख, शहर कार्याध्यक्ष शाम जगताप, पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष अमित लांडगे तसेच अक्षय माछरे, योगेश मोरे, निलेश निकाळजे, प्रसाद कोलते, कुणाल थोपटे, प्रतिक साळुंखे, संदीप आडसुळ आदी उपस्थित होते.

 यावेळी वरपे पुढे म्हणाले की, महानगरपालिकेत भाजपची भ्रष्टाचारी राजवट राज्यभर गाजत आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली मनपाने अनेक टेंडर केले. त्यातील बहुतांशी टेंडरचे भाजप पदाधिकारी वेंडर भागीदार आहेत. या महापालिकेत मनपाचे टेंडर, भाजपा वेंडर अशी परिस्थिती आहे. शहरातील सर्व सामान्य नागरिकांना याचा काहीच फायदा झाला नाही. परंतू भाजपाचे पदाधिकारी मात्र स्मार्ट झाले. या स्मार्ट सिटीत नागरिकांना दिवसाआड वेळी अवेळी पाणीपुरवठा होतो. लोकनेते शरद पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या महापालिकेत ज्यांना सत्तेची पदं दिली ते पक्ष सोडून गेले त्यांचा समाचार आता निवडणूकीत घ्यायला पाहिजे. 2017 नंतर या शहरात भाजपाने कोणता मोठा प्रकल्प आणला याचे उत्तर मतदारांना मिळाले पाहिजे असे वरपे म्हणाले.

 यावेळी राष्ट्रवादी शहर युवक सरचिटणीस सुजल शिंदे, सुनिल मोरे, सोमनाथ भोसले, रमजान सैय्यद, परवेज शेख, शहर उपाध्यक्ष प्रसाद तरस, भोसरी विधानसभा संघटक विक्की पंडीत, विकास गाडवे, भोसरी विधानसभा उपाध्यक्ष विशाल खरात, पिंपरी सरचिटणीस प्रतीक प्रशांत अलिबागकर यांना पदनियुक्तीचे पत्र देण्यात आले.सोमेश नंदुकुमार बारणे, सूरज राजकुमार पटेल, सिद्धांत दशरथ टोनपे, राहुल गायकवाड, आदित्य राजू कांबळे, निकेतन मनोज भागवत, अली इस्माईल आत्तार, रहील दादामियाँ मुलाणी, स्तवन उमेश कांबळे यांनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. 

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani