लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

राष्ट्रवादीचे प्रभागनिहाय संपर्क अभियान; बूथ कमिट्या सक्षम करणार

-शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान.

पिंपरी । लोकवार्ता-

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनात्मक बांधणीसाठी आजपासून प्रभागनिहाय संपर्क अभियान सुरु केले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाठी दोन अशा सहा टीम तयार केल्या आहेत.   बूथ कमिट्या सक्षम करणे, प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविणे. राज्य सरकारच्या योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देण्याबाबत अभियानात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. याशिवाय महापालिकेत सत्तेत असताना भाजपने केलेली चुकीची कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही कार्यकर्त्यांना केले जाणार आहे. हे अभियान आठ दिवस चालणार आहे. 

नगरसेवकांचा कालावधी संपल्याने पिंपरी महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरु झाली आहे. महापालिकेची निवडणूक कधीही लागू शकते. त्यामुळे  आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी संपर्क अभियान सुरू केले.  या अभियानाच्या माध्यमातून पक्ष संघटना बळकट करणे, कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जाणार आहेत.  पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रभागनिहाय संपर्क अभियानाला आजपासून सुरुवात झाली.   प्रत्येक विधानसभेला दोन अशा सहा टीम केल्या आहेत. बूथ कमिट्या सक्षम करणे,  वॉर्ड अध्यक्षांना सोबत घेऊन संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला जाईल.

 प्रभागातील नागरिकांच्या समस्या, अडी-अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना झालेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचविली जाणार आहे. त्याचबरोबर राज्यातील सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहितीही जनतेला देण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या योजनांचा लाभ लोकांना मिळवून देण्यासाठी मदत करणे. त्याशिवाय महापालिकेतील सत्ताधारी भाजपची चुकीची कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या जात आहेत. पुढील आठ दिवस या संपर्क अभियानाच्या माध्यमातून  पूर्ण शहर ढवळून काढले जाणार आहे.

पिंपरी विधानसभेची जबाबदारी दोन टीमवर देण्यात आली असून आमदार अण्णा बनसोडे यांच्या देखरेखीखाली ही टीम काम करणार आहे.  या टीमचे नेतृत्व माजी महापौर आझमभाई पानसरे यांच्याकडे देण्यात आले आहे. टीममध्ये माजी सत्तारुढ पक्षनेते जगदीश शेट्टी, सनी ओव्हाळ, शाम लांडे, सुलक्षणा शीलवंत, नारायण बहिरवाडे, काळूराम पवार, हरेश आसवानी, श्रीरंग शिंदे, विशाल काळभोर, ज्ञानेश्वर कांबळे दुस-या टीममध्ये संजोग वाघेरे-पाटील, योगेश बहल, राजू मिसाळ, वैशाली काळभोर, मंगला कदम, मोहंम्मद पानसरे, फजल शेख, राजू बनसोडे, निलेश पांढारकर, जगन्नाथ साबळे, वर्षा जगताप यांचा समावेश आहे. तर, काळूराम पवार, राजू मिसाळ, मंगला कदम, विशाल काळभोर, निलेश पांढारकर, गिरीष कुटे यांच्याकडे बैठकांचे नियोजन आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील संपर्क अभियानासाठी भाऊसाहेब भोईर, सुनील गव्हाणे, राजेंद्र जगताप, विनोद नढे, माया बारणे, शेखर ओव्हळ, मोरेश्वर भोंडवे, कैलास बारणे, संतोष बारणे, संदीप चिंचवडे, अतुल शितोळे, अर्पणा डोके, किसन नेटके तर दुस-या टीममध्ये प्रशांत शितोळे, रविकांत वर्पे, नाना काटे, मयूर कलाटे, गोरक्ष लोखंडे, संतोष कोकणे, सतीश दरेकर, राजेंद्र साळुंखे, विशाल वाकडकर, श्रीधर वाल्हेकर, शमिम पठाण, श्याम जगताप यांचा समावेश आहे. या सर्वांवर प्रभागनिहाय बैठकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार विलास लांडे यांच्या देखरेखीखाली टीम काम करणार आहे. शशिकिरण गवळी, उत्तम आल्हाट, धनंजय भालेकर, अरुण बो-हाडे, यश साने, विक्रांत लांडे, प्रकाश सोमवंशी, विजय लोखंडे, निवृत्ती शिंदे, पंकज भालेकर, गंगा धेंडे, रवी सोनवणे, संजय उदावंत, योगेश गवळी, संध्या गागरे यांची पहिली टीम असणार आहे. तर, दुस-या टीममध्ये कार्याध्यक्ष राहुल भोसले, महिलाध्यक्षा कविता आल्हाट, विनायक रणसुभे, वसंत बोराटे, चंद्रकांत वाळके, तानाजी खाडे, समीर मासुळकर, संजय वाबळे, दीपक साकोरे, जालिंदर शिंदे, वैशाली घोडेकर, प्रवीण भालेकर, देविदास गोफणे, विजय रसाळ यांचा समावेश आहे. या सर्वांवर प्रभागनिहाय जबाबदारी सोपविली आहे. प्रभागात जाऊन कार्यकर्त्यांची बैठक घेणे, संघटना बळकट, बूथ कमिट्या सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपविली आहे.

बूथ कमिट्यांच्या सक्षमीकरणावर भर – अजित गव्हाणे

शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, ”शहरात पक्षाचे संघटन बळकट केले जाणार आहे. त्यासाठी आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर, पक्षातील ज्येष्ठ नेते यांच्या मार्गदर्शनाखाली तीनही विधानसभा मतदारसंघात प्रभागनिहाय संपर्क अभियान सुरु केले आहे. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघाकरिता दोन अशा सहा टीम केल्या आहेत. या टीममधील पदाधिकारी प्रभागातील संघटनेचा आढावा घेतील. प्रभागातील अडी-अडचणी जाणून घेतल्या जातील. बूथ कमिट्या सक्षम करणे, नागरिकांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. राज्य शासनाचे लोकोपयोगी निर्णय जनतेपर्यंत पोहचविणे, जनतेला त्याचा लाभ मिळवून देणे याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाईल. त्याचबरोबर महापालिकेत सत्तेत असताना भाजपने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांची माहिती जनतेला दिली जाईल”.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani