मी डुकरांशी कुस्ती खेळत नाही!
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांच वादग्रस्त ट्विट.
मुंबई। लोकवार्ता-
विरोधी पक्षनेते व भाजप प्रवक्ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नोटाबंदीनंतर जवळपास वर्षभर महाराष्ट्रात बनावट नोटांचे एकही प्रकरण उघडकीस आले नव्हते. बनावट नोटांशी संबंधित प्रकरणे फडणवीसांनी समीर वानखेडेंच्या मदतीने दाबली, असे गंभीर आरोप करत अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले आहे .आता यावर देवेंद्र फडणवीस यांनी वादग्रस्त ट्विट केले आहे .
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांनी दहशतवाद्यांकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप केला होता. त्यावर मलिकांनी हे आरोप फेटाळत हा बाँम्ब फुसका असल्याचे सांगत हायड्रोजन बाँम्ब फोडणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर नवाब मलिक यांनी आज हायड्रोजन बाँम्ब फोडत फडणवीसांवर गंभीर आरोप केले.
यानंतर फडणवीसांनी वादग्रस्त ट्विट केले आहे. त्याला त्यांनी आजचा सुविचार म्हटले आहे. त्यांनी जॉर्ज बर्नाड शॉ यांचे वचन उद्धृत केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी खूप आधीच शिकलो आहे की डुकरांशी कुस्ती कधीही खेळू नये. त्यात तुमच्या अंगाला घाण लागते. पण यात डुकराला तेच आवडत असते.
नवाब मलिक म्हणाले आहेत की, देवेंद्र फडणवीस जो मूळ मुद्दा आहे तो भरकटवण्याचा आणि समीर वानखेडे यांना वाचवण्याचे काम करत आहेत. एखादा माणूस २००८ मध्ये नोकरीत येतो आणि १४ वर्षापासून मुंबई शहर सोडत नाही, त्याचे कारण फडणवीस आणि वानखेडेंचे जुने संबंध आहेत. फडणवीस इतरांवर आरोप करतात की तुमचे अंडरवर्ल्डशी संबंध आहे, पण फडणवीसांना विचारु इच्छितो की गुन्हेगार लोक आहेत त्यांना सरकारी महामंडळांचे अध्यक्ष का बनवले?असे अनेक प्रश्न नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारले आहेत.