post office scheme 2022 : ३९९ रुपयात १० लाखांचा विमा? काय आहे नवीन स्कीम जाणून घ्या.
लोकवार्ता : भारतीय डाक विभागानं एक लाभदायक योजना आणली आहे. आता फक्त ३९९ रुपयात १० लाखांचा अपघाती विमा मिळणार आहे. 18 ते 65 वयोमर्यादा असणाऱ्या लोकांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे. यासाठी वार्षिक ३९९ रुपयांचा हप्ता भरावा लागेल.

कसा असेल योजनेचा फायदा पाहुयात…
१) या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास १० लाखांचा विमा मिळणार आहे.
२) तसेच जर अपघातात कायमचे अपंगत्व आल्यास ही १० लाखांचा विमा मिळेल.
३) दवाखान्याचा खर्च म्हणून ६० हजार रुपयांचा विमा मिळू शकतो.
४) अपघात झालेल्या व्यक्तीच्या मुलांना शिक्षणासाठी १ लाख रुपयांपर्यंतचा खर्च दिला जाईल. जास्तीत जास्त २ मुलांना प्रतिवर्ष हा खर्च दिला जाणार आहे.
५) अपघात झाल्यानंतर ऍडमिट असेपर्यंत दररोज १००० रुपये असे सलग १० दिवसांची मदत केली जाईल.
६) ३०,००० पर्यंतचा ओपीडी खर्च देखील देण्यात येणार आहे.
७) अपघाताने पॅरालिसिस झाल्यास १० लाखाची मदत मिळेल.
८) त्याचबरोबर कुटुंबाला दवाखाना प्रवासखर्च म्ह्णून २५००० पर्यंत मदत करण्यात येणार आहे.
जर या स्कीम बाबत अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर जवळच्या डाक कार्यालयाशी संपर्क साधा.