लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

मे.काम फाउंडेशनमार्फत नालेसफाई कर्मचाऱ्यांच्या वेदनांवर फुंकर

पुणे (१७) : मे.काम फाउंडेशनच्या वतीने नालेसफाई कर्मचाऱ्यांच्या गटास सक्शन मशीन प्रदान करण्यात आले.
आजही आपल्या देशात सफाई कर्मचारी लाखोंच्या संख्येने कोणतेही विमा कवच अथवा सेफ्टी गॅजेट्स अर्थात हॅन्ड ग्लोज पीपीई किट शिवाय लोक सेवा प्रदान करत आहेत.यातील बहुसंख्य कर्मचारी कंत्राट पद्धतीने भरती केले गेले आहेत.सहाजिकच त्यांच्या आरोग्याचे प्रश्‍न सतत ऐरणीवर असतात तसेच कामाचे स्वरूप पाहता समाजापासून हे लोक थोडे अलिप्तच राहतात. अशाच नालेसफाई कर्मचाऱ्यांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी मे. काम फाउंडेशन पुढे सरसावले असुन
गेल्या काही वर्षापासून केंद्र सरकारच्या स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम सोबत जोडले गेले आहेत.

या कार्यक्रमाअंतर्गत आजवर १० हजार तरुणांना प्रशिक्षित करून रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.


कोरोना कालावधीमध्ये लाखो लोकांनी आपले प्राण गमावले संपूर्ण देशवासी जिवाच्या भीतीने घरात बसले असताना या फ्रन्टलाइन वॉरियर्सने मात्र आपल्या जिवाची पर्वा न करता नागरिकांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. अशाच या फ्रन्टलाइन वॉरियर्स अर्थात नालेसफाई कर्मचाऱ्यांचे कष्ट थोडे कमी व्हावेत आणि आरोग्याची हेळसांड होऊ नये या उद्देशाने मे. काम फाउंडेशनच्या वतीने पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या शुभहस्ते सक्शन मशीन सफाई सैनिक पुरवठा गटास प्रदान करण्यात आले याप्रसंगी मे. काम फाऊंडेशनचे सीईओ डॉ. स्मिता सिंग,
सल्लागार एम.कृष्णा आदी मान्यवर उपस्थित होते.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Exit mobile version