प्रथमच मोशीत अवतरणार बाहुबली हनुमान; निलेश बोराटे सोशल फाऊंडेशन च्या वतीने भव्य श्रीराम नवमी उत्सवाचे आयोजन
लोकवार्ता : आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निलेश बोराटे सोशल फाऊंडेशन च्या वतीने येत्या रामनवमीला भव्य श्रीराम नवमी उस्तव आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार दि. 31 मार्च 2023 रोजी सायंकाळी 5.00 ते 9.00 वा. पर्यंत हा सोहळा थाटात साजरा होणार आहे.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले आहे भव्य दिव्य बाहुबली हनुमान. मोशीत पहिल्यांदाच अशा भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मर्दानी खेळ, फटाक्यांची रोषणाई व आतिषबाजी, लहान मुलांची वेशभूषा व सन्मान सोहळा, तसेच महाआरती हे विशेष आकर्षण असणार आहे.
मोशीतील बाळाजी रामजी आल्हाट क्रीडांगण, श्रीराम चौक, रिव्हर रेसिडेन्सी जवळ हा उत्सव सोहळा होणार आहे. त्याचबरोबर महाप्रसाद सायंकाळी 8.00 वा. पासून होईल.
आपली जाज्वल्य परंपरा व संस्कृतीचे जतन करण्यासाठी आणि प्रभू श्रीरामांच्या पराक्रमाला वंदन करण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निलेश बोराटे सोशल फाऊंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.