लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

‘ताबडतोब हजर व्हा’, निर्मला सीतारमण यांचं इन्फोसिसच्या सलील पारेख यांना समन्स

पहिल्या दिवसापासून सुरू झालेल्या तक्रारींची रीघ पाहता…

लोकवार्ता । प्रतिनिधी

अडीच महिन्यानंतरही करदात्यांना प्राप्तिकर ई-फायलिंग पोर्टलवर अडचणींचा सामना करावा लागत आहे. अर्थ मंत्रालयाने याची दखल घेत इन्फोसिसचचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सलील पारेख यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं असून समन्स बजावलं आहे. सलील पारेख यांना २३ ऑगस्टला अर्थमंत्री निर्मली सीतारमन यांच्यासमोर हजर होण्यास सांगितलं आहे.

सलील पारेख यांनी यावेळी निर्मला सीतारमन यांच्यासमोर लाँच होऊन अडीच महिने झाल्यानंतरही ई-फायलिंग पोर्टलवरील तांत्रिक त्रुटी अद्याप दूर का झाल्या नाहीत याचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.

प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया सुलभ, सोपी व गतिमान करण्याच्या उद्देशाने ७ जूनला सायंकाळी नव्याने सुरू करण्यात आलेल्या प्राप्तिकर ई-फायलिंग संकेतस्थळाची पहिली अनुभूती करदात्यांसाठी त्रासदायकच ठरली होती. पहिल्या दिवसापासून सुरू झालेल्या तक्रारींची रीघ पाहता, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे संकेतस्थळ विकसित करणाऱ्या इन्फोसिस टेक्नॉलॉजीज आणि तिचे विद्यमान अध्यक्ष नंदन नीलेकणी यांना जाहीरपणे जाब विचारत, अडचणी तात्काळ दूर करण्याचे निर्देश दिले होते.

वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी प्रणालीसाठी ‘जीएसटी नेटवर्क (जीएसटीएन)’ संकेतस्थळ तयार करणाऱ्या इन्फोसिसवर, २०१९ साली प्राप्तिकराच्या ई-भरणा करणारी अद्ययावत प्रणाली विकसित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. करदात्यांकडून दाखल होणाऱ्या विवरण पत्रावर प्रक्रियेचा कालावधी सध्याच्या ६३ दिवसांवरून एक दिवसांवर आणून, त्यायोगे कर-परतावा (रिफंड) वितरित करण्याची प्रक्रियाही गतिमान करण्याचे उद्दिष्ट यामागे होते. त्यानुसार तयार केले गेलेले नवीन संकेतस्थळ ७ जूनच्या रात्रीपासून कार्यान्वितही झाले. मात्र नवीन ई-फायलिंग संकेतस्थळावर लॉग इन करण्यात असमर्थता आणि त्याच्या वापरासंबंधाने अनेक प्रकारच्या अडचणींचा करदात्यांना सामना करावा लागत असल्याने दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच अर्थमंत्री सीतारामन यांच्या ट्विटर टाइमलाइनवर तक्रारींची रीघ लागली होती.

अर्थमंत्र्यांनी ट्वीटद्वारेच या बाबतीत आपला संताप व्यक्त केला होता. ‘इन्फोसिस आणि नंदन निलेकणी हे दर्जेदार व गुणात्मक सेवेची अपेक्षा राखणाऱ्या करदात्यांचा हिरमोड करणार नाहीत अशी आशा आहे,’ असे त्यांनी ट्वीट केले होते.

इन्फोसिसने दिलं होतं आश्वासन
निर्मला सीतारमण यांच्या ट्विटला उत्तर देताना इन्फोसिस टेक्नॉलॉजीज आणि विद्यमान अध्यक्ष नंदन नीलेकणी यांनी म्हटलं होतं की, “निर्मला सीतारमणजी नवीन ई-फायलिंग पोर्टल फायलिंग प्रक्रिया सुलभ करेल तसंच वापरकर्त्यांना चांगला देईल. पहिल्या दिवशी काही तांत्रिक त्रुटी आमच्या लक्षात आल्या असून त्यांचे निराकरण करण्याचे काम करत आहोत. आलेल्या अडचणींबद्दल इन्फोसिस खेद व्यक्त करत असून पुढील आठवड्यात यंत्रणा स्थिर होईल अशी आशा आहे”.

केंद्रीय अर्थमंत्र्यांनीच केली होती घोषणा
दरम्यान, हे वेब पोर्टल सुरू झाल्यानंतर खुद्द निर्मला सीतारमण यांनीच ट्वीट करून यासंदर्भातली माहिती करदात्यांना दिली होती. “बहुप्रतिक्षित e-filing portal 2.0 काल रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी सुरू झालं आहे. करदात्यांना करभरणा प्रक्रिया सुलभ करण्याच्या व्यवस्थेमधला हा मैलाचा दगड ठरला आहे. हे पोर्टल देशवासीयांच्या सेवेसाठी आहे”, असं ट्विट त्यांनी केलं होतं. त्यानंतर काही तासांतच त्यांना इन्फोसिसला तांत्रिक बिघाडावरून सुनवावं लागलं होतं.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani