निर्विकार आरोग्य दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा पार
लोकवार्ता : गतवर्षी धन्वंतरी जयंतीनिमित्त आयुष मंत्रालयाने ‘हर दिन हर घर आयुर्वेद’ ही संकल्पना पुढे आणली आहे. या संकल्पनेतून प्रेरित होऊन भोसरी येथील निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलने प्रत्येक घरोघरी आयुर्वेद पोहोचावा, यासाठी निर्विकार आरोग्य दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

या दिनदर्शिकेचा उद्देश एकच आहे की, घरातील प्रत्येक माणूस आरोग्याच्या दृष्टीने जागरूक व्हावा, त्यामध्ये दिनचर्या, ऋतुचर्या, योगाभ्यास, सणांचे आरोग्यदायी महत्त्व, पौष्टिक पाककृती, आहारीय वर्ग त्याचे उपयोग, उपवासाला काय खावे, घरगुती कोणते उपाय करावेत या सर्वांची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली. यावेळी डॉ. नीलेश लोंढे, डॉ. सारिका लोंढे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच इतर उपस्थित अतिथींनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
डॉ. नीलेश लोंढे, डॉ. सारिका लोंढे, नामवंत वैद्य ज्योती मुदर्गी, सुकुमार सरदेशमुख, अतुल देशमुख, संतोष सूर्यवंशी, जयकुमार ताम्हाणे, निमा संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. सुहास जाधव आदी उपस्थित होते.