पुढील ५ वर्षे कोणतीही कर्जमाफी नाही
२ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर

लोकवार्ता।प्रतिनिधी
‘कोरोना संसर्गामुळे राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी पाहता आगामी ५ वर्षे शेतकऱ्यांना कोणतीच कर्जमाफी देता येणार नाही’असे विधान अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे. पीक कर्ज आढावा बैठकीत शेतकरी कर्जमाफीच्या संदभनि एका प्रश्नावर बोलताना त्यांनी ही बाब अधोरेखित केली. जेमतेम कर्मचाऱ्यांचे पगार होतील अशी सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती आहे. त्यामुळे कर्जमाफीचा मुद्दाच उपस्थित होत नाही. पुढील पाच वर्षे कुठलीच कर्जमाफी दिली जाणार नाही हे शेतकऱ्यांनादेखील सांगा असे आवाहन त्यांनी केले आहे.
घोषित कर्जमाफीचा लाभ देण्यास कटिबद्ध :
राज्यशासन घोषित कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकयांना देण्यास कटिबद्ध आहे.परिस्थिती पाहता भविष्यात शेतकयांनी कर्जमाफी,वीज देयक माफीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. महाआघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली .बहुतांश शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे असेही ते म्हणाले.