पिंपरी-चिंचवडमधील माझ्याशी संबंधित कोणीही अशा स्टिकर्स लावू नयेत-महेश लांडगे
पिंपरी | लोकवार्ता-
आमदार आणि खासदारांच्या गाडीवर सर्रासपणे अशोकस्तंभाचं स्टिकर लावलेली असतात. मात्र, असे स्टिकर लावणे हे बेकायदेशीर असून यापुढे थेट आमदार आणि खासदारांवर सुद्धा कारवाई केली जाणार आहे. याबाबतचे आदेश थेट वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी राज्यातल्या सर्व पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

सन्माननीय आमदार आणि खासदार यांच्या गाडीवर अशोकस्तंभ मुद्रीत असलेले स्टिकर लावणे बेकायदा आहे. असे स्टिकर लावल्यास स्वत: आमदार अथवा खासदारांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेश वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील माझ्याशी संबंधित कोणीही अशा स्टिकर्स लावू नयेत, असे अवाहन करतो-महेश लांडगे.