लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवस सोहळा नव्हे; धडाकेबाज महोत्सव!

-संपूर्ण महिनाभर भोसरीत कार्यक्रम- उपक्रमांची रेलचेल

-सेलिब्रेटी, सर्वपक्षीय नेत्यांकडून लांडगे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

पिंपरी | लोकवार्ता-

पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा वाढदिवस (दि.२७) मोठ्या दिमाखात साजरा झाला. वाढदिवस अभिष्ठचिंतन सोहळ्याला भोसरीतील गावजत्रा मैदानावर अक्षरश: जनसागर लोटला. भाजपासह सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते- पदाधिकारी यांनी लांडगे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केले.

भोसरीतील ऐतिहासिक गावजत्रा मैदानावर आमदार लांडगे यांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील सुमारे ३५ हजार लोकांच्या उपस्थितीत आमदार लांडगे यांचे अभिष्ठचिंतन करण्यात आले. यावेळी भाजपाचे नेते आणि चिंचवड मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर हिरानानी घुले, भाजपा नेत्या आशा बुचके, सभागृह नेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव सर्व पदाधिकारी- नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, भारतीय जनता पार्टीसह विविध सामाजिक संस्था, संघटना यांच्या वतीने नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीपासूनच आमदार लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, पर्यावरण क्षेत्राशी संबंधित उपक्रमांमुळे भोसरीसह पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार वातावरण निर्मिती करण्यात आली.
रिव्हर सायक्लोथॉन, अवयवदान जनजागृती अभियान, इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान जनजागृतीसह प्रभागनिहाय कार्यक्रमांमुळे भोसरी विधानसभा मतदार संघात लांडगेंचा वाढदिवस सोहळा नव्हे, तर धडाकेबाज महोत्सव साजरा करण्यात आला.

बैलगाडा शर्यंतीचा प्रश्न महेश लांडगेच सोडवतील : आमदार लक्ष्मण जगताप
भाजपा नेते तथा आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, बैलगाडा शर्यतींवर पिंपरी-चिंचवडकरांचे विशेष प्रेम आहे. बैलगाडा शौकींनाना अपेक्षीत असलेले प्रतिनिधीत्व आमदार लांडगे करीत आहेत. भविष्यात बैलगाडा शर्यतीचा विषय आमदार लांडगे यांच्या माध्यमातून सुटणार आहे, असा विश्वासही आमदार जगताप यांनी व्यक्त केला.
प्रत्येक गाडामालक महेश लांडगेंसोबत : भाजपा नेत्या आशा बुचके
भाजपा नेत्या आशा बुचके म्हणाल्या की, महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती सुरू करण्याची धमक केवळ आमदार महेश लांडगे आणि भाजपाच्या प्रदेश- केंद्रीय नेतृत्त्वामध्ये आहे. त्यामुळे आगामी काळात शिरुर लोकसभा मतदार संघातील आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यातील गाडामालक लांडगे यांच्या पाठिशी राहतील. तसेच, निश्चितपणाने आमदार लांडगे बैलगाडा शर्यती सुरू करण्यात यशस्वी होतील, असा विश्वासही बुचके यांनी व्यक्त केला.

कुस्तीनंतर राजकीय मैदानही गाजवले : आमदार दिलीप मोहिते-पाटील
गेल्या २० वर्षांच्या राजकीय जीवनात महेश लांडगे यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. लांडगे भोसरीकरांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. भोसरीकरांना काय हवे? काय नको? याची जाण लांडगे यांना आहे. राजकारणात अनेकांना संधी मिळते. पण, संधी सोने करणारी खूप कमी लोक आहेत. त्यापैकी एक महेश लांडगे आहेत. त्यांना राजकीय पार्श्वभूमी मोठी नाही, तर कुस्तीची पार्श्वभूमी आहे. कुस्तीच्या मैदानात उतरायचे आणि मैदान गाजवायचे हेच पैलवानाला माहिती असते. पण, आमदार लांडगे यांनी राजकीय मैदानेही गाजवायला सुरूवात केली आहे. राजकारण आणि पक्ष यापलिकेडे जावून आमदार लांडगे आणि आम्ही संबंध जपले आहेत. आमदार लांडगे यांचे सर्वपक्षासोबत मित्रत्वाचे संबंध आहेत. त्यामुळे अडचणी येत नाही, अशा भावना खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani