“स्मार्ट सिटी प्रकरणातील चौकशी आता ईडीकडे”
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पातील चौकशी ईडी करणार असल्याचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी स्पष्ट केलं.
पिंपरी।लोकवार्ता-
पिंपरी चिंचवड शहरातील स्मार्ट सिटी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालला असून ठेकेदारांना पोसण्याचे काम चालू आहे. या सर्वामध्ये नागरिकांचा कमी आणि ठेकेदारांचा जास्त फायदा होत असल्याचे श्रीरंग बारणे यांनी सांगितले.
शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी ईडी संचालक संजय कुमार मिश्रा यांची आज दिल्लीतील कार्यालयात भेट घेतली. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पातील भ्रष्टाचाबद्दल चे सर्व कागदपत्रे त्यांच्या देऊन सर्व सविस्तर माहिती सांगण्यात आली . त्यावर ‘आणखी काही कागदपत्रे असतील तर, ती द्यावीत याची सर्व चौकशी करतो असे आश्वासन ईडीचे संचालक मिश्रा यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना दिले. त्यामुळे स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराची आता ईडीमार्फत चौकशी होणार आहे.

याबाबतची माहिती देताना खासदार बारणे म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी ईडीकडे केली आहे. स्मार्ट सिटी योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालला आहे. स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराबाबत मी 18 मार्च 2020 रोजी केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांना पत्र दिले होते. त्याचबरोबर लोकसभेत 13 फेब्रुवारी 2021 रोजी स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर शहरी विकास मंत्रालयाने स्मार्ट सिटीकडे माहिती मागवली. पण, स्मार्ट सिटीने गोलमाल उत्तरे दिली.