लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

पिंपरी महापालिकेत ओबीसी आरक्षण गेल्याचा कुणबी, माळी समाजाला फटका; ‘या’ जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूक

– सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा अहवाल फेटाळला आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातून लढण्याची 38 जणांची संधी गेली आहे. त्यामुळे 114 जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूक होईल.

पिंपरी । लोकवार्ता-

ओबीसी आरक्षणासंदर्भात  मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय महापालिकेची आगामी निवडणूक झाल्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिका 114 जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूक होईल. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून (ओबीसी) लढण्याची तब्बल 38 जणांची संधी हिरावली आहे. ओबीसी आरक्षण नाकारल्याचा सर्वाधिक फटका कुणबी, माळी समाजाला बसला आहे. कारण, मागील निवडणुकीत 35 जण ओबीसी प्रवर्गातून निवडून आले होते. त्यात सर्वाधिक भाजप नगरसेवकांचा समावेश आहे. आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 46 प्रभाग तर नगरसेवक संख्या 139 असणार आहे. 139 नगरसेवकांपैकी 69 पुरुष तर 70 महिला नगरसेविका अशी वर्गवारी असणारा 139 नगरसेवकांपैकी 3 जागा अनुसूचित जमाती (एसटी)साठी तर 22 जागा अनुसूचित जाती (एससी)साठी राखीव असतील. ओबीसी आरक्षण मिळाले असते तर 38 जागा ओबीसींसाठी राखीव राहिल्या असत्या. पण, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा अहवाल फेटाळला आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातून लढण्याची 38 जणांची संधी गेली आहे. त्यामुळे 114 जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूक होईल.

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूकसाठीच्या प्रारूप प्रभागनिहाय मतदार यादीचे काम पूर्ण झाले आहे. प्रभागरचनेस राज्य निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतर ही प्रभागनिहाय मतदार यादी अंतिम केली जाणार आहे. प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा जाहीर केल्यानंतर प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेस दिले होते. त्यासाठी पिंपरी,चिंचवड,भोसरी विधानसभा मतदार संघातील मतदारांच्या मूळ याद्या व पुरवणी यादी वापरून कामकाज करण्यात आले आहे. कर्मचार्‍यांना मतदार यादी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.एका कर्मचार्‍यास मतदार यादीच्या सहा भागांची जबाबदारी होती. त्यानुसार कर्मचार्‍यांनी नवीन प्रभागात त्या-त्या मतदारांची नावे आहेत की नाही हे तपासले. त्यांच्या नोंदी निवडणूक आयोगाने दिलेल्या कंट्रोल चार्ट तसेच, एमएस एक्सेलमध्ये भरण्यात आल्या. ते काम पूर्ण झाले आहे.आता अंतिम प्रभागरचना आणि आरक्षण सोडत जाहीर कधी होणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिकेची प्रारूप रचना 1 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली होती.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani