ओमीक्रोनच्या संशयित रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह
-पार्थ पवार यांनी ट्विट करून दिली माहिती
पिंपरी ।लोकवार्ता-

पिंपरी चिंचवड शहरातील नायजेरिया मधून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह सोसायटीतील संशयित रुग्णांचे आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पार्थ पवार यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून त्याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.
त्यामुळे पिंपरी चिंचवाडकरांना दिलासा मिळाला आहे.
पार्थ पवार यांनी ट्विट मध्ये नमूद केले आहे की, पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील सर्व रहिवाशांसाठी ही एक मोठी दिलासा देणारी बाब आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह सोसायटीतील संशयित रुग्णांचे आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह आले आहेत. प्रशासनाला सहकार्य करा. काळजी घ्या.