महाराष्ट्र राज्य व्यवसायिक व्यापारी संघटनेच्या वतीने शिवश्री कृतज्ञता सन्मान सोहळा थाटात संपन्न..
-शिवजयंती निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा शिवश्री पुरस्काराने सन्मान..!
पिंपरी | लोकवार्ता-
महाराष्ट्रभरातील व्यवसायिक व व्यापारी बांधवांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवणारी तसेच नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी अग्रणी भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्र राज्य व्यावसायिक व्यापारी संघटनेने बालेवाडी येथील पंचतारांकित हॉटेल ऑर्किड या ठिकाणी आयोजित केलेला शिवश्री कृतज्ञता सन्मान सोहळा 2022 नुकताच मोठ्या थाटात पार पडला. या शिवश्री कृतज्ञता सन्मानास महाराष्ट्रासाठी शिर्षक मान्यता दिली असून हा शिवश्री सन्मान दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंतांना दिला जाणार आहे.
आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ वकील पद्मश्री ऍड. उज्वल निकम, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर,तसेच डॉ.राहुल गेठे मुंबई आयुक्त, डेप्युटी कमिशनर, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मंत्रालय आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, तसेच पावनखिंड चित्रपटात वीर बाजीप्रभूंनी भूमीका अजरामर करणारे अभिनेते अजय पुरकर, युवा कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांना शिवश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर विविध क्षेत्रात आपल्या उल्लेखनीय कामगिरी करणारे आर.जे. बंड्या, स्नेहा कोकणे पाटील, मदन गायकवाड, सचिन पोतुलवार, सत्यवान बटवाल, भाऊसाहेब भोईर, वंदना आल्हाट, शरद पाबळे, कविता भोंगाळे, इंदिरा अस्वार, स्नेहल निम्हण, सविता कुंभारकर, सोनिया अग्रवाल, निलेश मोटे, योगेश तळेकर, दीपक थोरात, आदित्य शिंदे, श्वेता कापसे व मच्छिंद्र तरस यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच या सोहळ्यासाठी विशेष सहकार्य करणाऱ्या टीम रे क्रियेशन व चिराग फुलसुंदर या संस्थांचा ही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे पद्मश्री ऍड. उज्वल निकम यांनी संघटनेच्या कार्याची दाखल घेऊन सहवास दर्शवत शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले त्याचबरोबर महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जी माता जगाला घडविते अशा महिला जन्माचा आदर करा असे आवाहन केले यांनी सुद्धा संघटनेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या आयोजक महाराष्ट्र राज्य व्यवसायिक संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती रामाने, उपाध्यक्ष रोहिदास दांगट, सचिव व ग्रामीण अध्यक्ष अनिता डफळ आणि व्यापारी सेलचे अध्यक्ष सागर चोरघे यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले तसेच पुरस्कारार्थी मान्यवरांचे अभिनंदन केले.
यावेळी शिवश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या विविध क्षेत्रातील नामांकितांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले, तसेच शिवश्री कृतज्ञता सन्मान सोहळा यापुढेही दरवर्षी शिवश्री शिर्षकाने संपन्न केला जाईल असा विश्वास महाराष्ट्र राज्य व्यवसायिक व्यापारी संघटना यांनी यावेळी व्यक्त केला..