पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे महिला बचत गटांचा केला सन्मान
पिंपरी | लोकवार्ता-
जागतिक महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे १० वर्षे पूर्ण झालेल्या १०० महिला बचत गटांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आला .

यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, स्थायी समिती सभापती अॅड. नितिन लांडगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, महिला व बालकल्याण समिती सभापती सविता खुळे, नगरसदस्या स्वाती उर्फ माई काटे अनुराधा गोफणे, निर्मला गायकवाड, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उप आयुक्त अजय चारठाणकर, सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके, विविध महिला बचत गटांचे पदाधिकारी उपस्थित होते.
