लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

महापालिकेच्या वतीने तुकाराम बीज निमित्त संत तुकाराम महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन

-आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण.

पिंपरी । लोकवार्ता-

जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत तुकाराम महाराज यांच्या पिंपरी मधील संत तुकारामनगर येथील पुतळ्यास आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, माजी नगरसेविका सुलक्षणा धर, माजी नगरसदस्य जितेंद्र ननावरे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती मायला खत्री, जनसंपर्क विभागाचे वासिम कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते विरेंद्र बहल, वसंत शेवडे, नंदू कदम, माधुरी आंबेकर, वर्षा जगताप, माणिक अहिरराव, हरिभाऊ करमाळकर, सुभाष कोळी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त निगडी येथील भक्ती शक्ती समुह शिल्पास आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, अ क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे, कार्यकारी अभियंता प्रविण घोडे, जनसंपर्क विभागाचे वासिम कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते जीवन बोराडे, सागर तापकीर आदी उपस्थित होते.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani