महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भाजपाच्या पदाधिका-यांकडून अभिवादन
– भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचे दिल्लीत पुष्पांजली
पिंपरी lलोकवार्ता-
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण देशभरात त्यांना अभिवादन केले जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाच्या पदाधिका-यांनी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

यावेळी भाजपा महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा उमा खापरे, नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, जिल्हा सरचिटणीस विजय फुगे, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मनोज तोरडमल, नगरसेवक माऊली थोरात, अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष सुभाष सरोदे, महिला शहराध्यक्षा उज्वला गावडे, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश चिटणीस कोमल शिंदे, जिल्हा चिटणीस नंदू कदम, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संजय पटनी, संतोष टोणगे, कोमल शिंदे, अनुसूचित जाती मोर्चा शहर सरचिटणीस संतोष रणसिंग, कार्यालय प्रमुख संजय परळीकर, आकाश शिंदे, नेताजी शिंदे आदी उपस्थित होते.

दरम्यान, भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पाहार अर्पण करुन अभिवादन दिले. यावेळी माजी महापौर राहुल जाधव, अनिल आण्णा लांडगे, संभाजी घारे, महेशबापू शेवकरी व अतुल बोराटे उपस्थित होते.

6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दिल्ली येथे निधन (महापरिनिर्वाण) झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबई दादर येथील चैत्यभूमीवर आणण्यात आले. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देशभर 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जाते. राष्ट्रपती, पंतप्रधान आदींनी देखील संसदेत डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात भाजप पदाधिका-यांनी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.