भोसरीत दोन तवेरा गाडी मधून दीड टन गोमांस जप्त !
लोकवार्ता: आज (दि. 18 ) अहमदनगर येथे गायी व बैल कापून त्याचे मांस पुण्यातील कोंढवा , खडकी येथे दोन तवेरा गाडी नं 1) mh.04.dw.3080 2) mh.19.bj.5484 यामध्ये भरून जात असल्याची माहिती मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांना मिळाली.

त्यावेळी स्वामींनी तात्काळ भोसरी MIDC पोलिसांच्या मदतीने सापळा रचला आणि पहाटे च्या सुमारास दोन तवेरा गाड्या ताब्यात घेऊन गाड्यांची पाहणी केली असता त्यामध्ये गोमांस आढळून आले.
टेम्पो चालकांनी सदर गाडीत गायी आणि बैलाचे मांस असून ते अहमदनगर येथे भरून पुणे येथे घेऊन जात असल्याचे पोलिसांना गोरक्षकांनी सांगितले. पोलिसांनी दोन्ही तवेरा गाड्या ताब्यात घेऊन गोवंश कापणारे , गोमांस विकत घेणारे, गाडी चालक व मालक यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईत अनिकेत सस्ते , प्रतीक भेगडे , शरद कोतकर , हर्षद पारखे , श्रेयश शिंदे , कृष्णा सातपुते , रुपेश सकपाळ , अभिषेक कडूसकर , आशुतोष मारणे , नितीन कदम , विशाल शिंदे , गणेश भांगे , महेश गायकवाड , मंगेश गराडे, रंजीत सस्ते , शुभम सस्ते ,सुहास देशमुख, साईराज तापकीर, अथर्व सुकाळे , अक्षय वांडेकर , राजेश लोखंडे , निखिल माने व बजरंगदल मोशी यांचा समावेश होता.