पावसाची वाट पाहणाऱ्या पुणेकरांनो… पुढचे दोन दिवस हलक्या सरी कोसळणार !
लोकवार्ता : संपूर्ण राज्यात पावसाळा सुरु झाला तरीही पुण्यात मात्र पावसाने आजूनही हजेरी लावली नाही. त्यामुळे पावसाची वाट पाहणाऱ्या पुणेकरांसाठी पुढचे दोन दिवस हलक्या सरी पडतील असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

संपूर्ण राज्यात पावसाळा सुरु झाला तरीही पुण्यात मात्र पावसाने आजूनही हजेरी लावली नाही. त्यामुळे पावसाची वाट पाहणाऱ्या पुणेकरांसाठी पुढचे दोन दिवस हलक्या सरी पडतील असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
येत्या १९ जूनपासून शहरात पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरवर्षी १५ जूनपर्यंत पावसाला सुरवात होते यंदा मात्र १५ जून पर्यंतच्या हंगामात फक्त २८ मिमी पाऊस पडला आहे. IMD च्या अधिकारांनी १९ जून पर्यंत हलक्या सरी पडतील असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदा पुणेकरांना पावसासाठी आजून काही दिवस वाट पहावी लागणार आहे.
दहावी च्या निकालात मुलींची बाजी ; कोकणाचा सर्वाधिक निकाल, यंदा ९६.९४ टक्के निकाल