विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोना ची लागण
-ट्विटर अकाउंट वर दिली माहिती.
पुणे । लोकवार्ता-
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनानी दुसऱ्यांदा विळखा घातला आहे. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र काळजी करण्याचे काही कारण नाही. मी सध्या होम आयसोलेशनमध्ये असून, घरीच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेत आहे. माझ्या जे सपर्कात आले आहेत, त्यांनी देखील कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन देखील देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे . यापूर्वी देखील एकदा त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा त्यांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेतले होते. आता पुन्हा एकदा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान फडणवीस यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी आपल्या सर्व राजकीय कार्यक्रम रद्द केले आहेत.

संपर्कात असलेल्यांना चाचणी करण्याचे केले आवाहन
माझ्या संपर्कात गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये जी लोक आली होती, त्यांनी देखील कोरोना चाचणी करून घ्यावे असे आवाहन करणारे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. फडणवीस यांना कोरोनाची लागण होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी देखील एकदा त्यांना कोरोनाची लागण झाली होती, तेव्हा त्यांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेतले होते. यावेळी त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने फडणवीस यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.