लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

नाशिकफाटा येथील मेट्रो स्टेशनच्या भोसरी स्टेशन या नावास पतित पावन संघटनेचा विरोध

-नाशिक फाटा चौकामधील मेट्रो स्टेशनला भोसरीचे नाव देण्यात आले आहे. ते बदलण्याची मागणी पतित पावन संघटनेने केली आहे.

पिंपरी | लोकवार्ता-

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये काही मार्गांवर मेट्रो सुरू झाली मात्र वाद काही थांबायला तयार नाही. आधी तर उद्धाटनावरून वाद सुरू होता. आता नवा वाद समोर आला आहे. नाशिकफाटा येथील मेट्रो स्टेशनच्या भोसरी स्टेशन या नावास पतित पावन संघटनेने विरोध केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये नागरिकांसाठी मेट्रो सुरू करण्यात आली आहे. मात्र नाशिक फाटा चौकामधील मेट्रो स्टेशनला भोसरीचे नाव देण्यात आले आहे. ते बदलण्याची मागणी पतित पावन संघटनेने केली आहे. मुंबई-पुणे महामार्गावरील नाशिककडे जाण्यासाठी या ठिकाणाहून सुरूवात होते, म्हणून या चौकाला नाशिकफाटा चौक हे नामकरण जनतेकडून झालेले आहे. तसेच या ठिकाणावरून भोसरी हे गाव जवळपास 4 किलोमीटर आहे, त्यामुळे ते नाव बदलावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

पतित पावन संघटनेने यासंबंधी पतित पावन संघटनेने पिंपरी चिंचवड आयुक्तांना पत्रव्यवहारदेखील केला आहे. त्यात असे म्हटले आहे, की वार रविवार दिनांक 06/03/2022 रोजी मेट्रो रेल सर्व सामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात आली. परंतू नाशिक फाटा चौकामधील मेट्रो स्टेशनला भोसरीचे नाव देण्यात आले आहे. सदर नाव देण्यामागे नेमका कसा निर्णय घेण्यात आला आहे, असा लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे. मुंबई-पुणे महामार्गावरील नाशिककडे जाण्यासाठी या ठिकाणाहून सुरूवात होते, म्हणून या चौकाला नाशिकफाटा चौक हे नामकरण जनतेकडून झालेले आहे. तसेच या ठिकाणावरून भोसरी हे गाव जवळपास 4 किमीचे आसपास असताना आपण काय म्हणून या स्टेशनला भोसरीचे नाव दिले आहे? हे एकत्र आपण जाहीररीत्या प्रकट करावे अन्यथा या मेट्रो स्टेशनचे भोसरी हे नाव त्वरीत बदलून नाशिकफाटा मेट्रो स्टेशन अथवा उड्डाणपुलाला असलेले नाव जमशेदजी टाटा मेट्रो स्टेशन असे नाव आपण या मेट्रो स्टेशनला द्यावे, अशी आपणास मागणी करण्यात येत आहे. आपणाकडून त्वरीत अंमलबजावणी होईल, ही अपेक्षा.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani