टाळगांव चिखली येथे संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त “जगद्गुरू संत तुकाराम महाराज जीवन दर्शन” या विषयावर परिसंवादाचे आयोजन
-पिंपरी चिंचवड आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते उदघाटन.
चिखली। लोकवार्ता-
पुण्याच्या देहूत जगतगुरु संत तुकाराम महाराजांचा बिजोत्सव पार पडत आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळं बिजोत्सवावर अनेक निर्बंध होते. परंतु, यावर्षी करोना आटोक्यात आल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ, टाळगांव चिखली यांच्या वतीने संत तुकाराम महाराज बीजेनिमित्त “जगद्गुरू संत तुकाराम महाराज जीवन दर्शन” या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या वेळी आयुक्त तथा जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठाचे अध्यक्ष राजेश पाटील, आमदार महेश लांडगे , संतपीठाचे प्रा डॉ सदानंद मोरे , राजु महाराज ढोरे, अभय टिळक, स्वाती मुळे यांच्यासह परिसरातील नागरिक आणि वारकरी संप्रदायातील प्रतिनिधी उपस्थित होते.
