रुपीनगर येथे इफ्तार पार्टीचे आयोजन;विलास लांडे यांची उपस्थिती
-विलास लांडे यांनी दिला एकात्मतेचा संदेश.
तळवडे । लोकवार्ता-
मुस्लीम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून, उपवास सोडण्यासाठी नुकतेच रूपीनगर येथे रोजा इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते. रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात पार पाडली. या कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण मंडळाचे मा.सभापती धनंजय भालेकर व मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

रूपीनगर येथे शुक्रवारी (दि.०८) सायंकाळी सहा वाजता इफ्तार पार्टी झाली. यावेळी या कार्यक्रमास शुभेच्छा देताना माजी आमदार विलास लांडे म्हणाले की, सामाजिक सलोखा आणि एकात्मतेसाठी सर्व समाजातील लोक एकत्र येणे आवश्यक आहे. सर्व धर्मांमध्ये समानतेची जाणीव निर्माण करून आपापसांतील बंधुभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन होणेसुद्धा महत्त्वाचे आहे. दोन समाज एकत्र आल्याने मतभेद दूर होऊन बंधुत्त्व भावना वाढीस लागण्यास मदत होणार आहे. अशा सणांमुळे हिंदू-मुस्लिम बांधव मनापासून एकत्र येतात. सामाजिक सलोखा राखण्यात इफ्तार पार्टीची मोठी मदत होत असून त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होते. आपण सर्व एक आहोत ही भावना वृद्धिंगत होण्यासाठी रोजा इफ्तार पार्टी महत्त्वाची आहे.

यावेळी नगरसेवक पंकज भालेकर,प्रवीण भालेकर, मा.नगरसेवक विनायक रणसुभे, शरद भालेकर, राहुल पवार, अरुण थोपटे, दिपक सकोरे, इवेंचर स्कूलचे कुलकर्णी सर,रवींद्र सोनवणे,देवा यंकुळे,रवी सरवदे, सोमाजी बोडके,लोकेश शिंपी, कडलक मामा,प्रविण पोकळे यांच्यासह रुपीनगर तळवडे येथील मुस्लिम समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.