लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

शनिवारी अनाथ-दिव्यांग मुलांच्या स्पर्धेचे आयोजन

स्पर्धेचे संयोजन टीम रे क्रियेशनच्या वतीने

लोकवार्ता । प्रतिनिधी

पिंपरी ( दि.१८ ) : महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन,पिंपरी-चिंचवड पोलीस आणि केअर फॉर यु यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ हंट फॉर सिक्रेट सुपरस्टार ‘ या अनाथ मुलांच्या गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा शनिवार ( दि २१) रोजी सं.४ ते ८ दरम्यान पिंपरीतील डी. वाय.पाटील कॉलेजच्या सांस्कृतिक भवनामध्ये पार पडणार आहे.

या अनोख्या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सुप्रसिद्ध गीतकार अवधूत गुप्ते उपस्थित असतील.
गायिका वैशाली सामंत, बॉलीवूडचे गायक शादाब फरीदी( सुलतान), अल्तमाश फरीदी (हाऊसफुल्ल ४) हे परीक्षक म्हणून काम पाहतील.

कार्यक्रमाचे आयोजन ‘ केअर फॉर यु ‘ संस्थेच्या पायल सारडा राठी व सिल्वर ग्रुपचे संतोष बारणे यांनी केले आहे. संपुर्ण स्पर्धेसाठी सिल्वर ग्रुपचे विशेष सहकार्य लाभले आहे.या अनोख्या स्पर्धेचे संयोजन टीम रे क्रियेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

‘या कार्यक्रमास व्यवसायिक तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सिल्वर ग्रुप व कर्तव्यम फाउंडेशनच्या वतीने आम्ही सहकार्य करत आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील अनाथ, निराधार व दिव्यांग कलाकार मुलांना हक्काचे व्यासपीठ मिळुन त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा. येत्या काळातही असे विविध उपक्रम राबवून मुलांना प्रोत्साहन देण्याचे काम आम्ही करणार आहोत ‘असे संतोष बारणे यांनी यावेळी सांगितले.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani