लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

हेल्पएज इंडिया व तळवडे,रुपीनगर,सहयोगनगर प्रभाग १ मधील सर्व महिला भगिनींच्या वतीने महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन

तळवडे | लोकवार्ता-

हेल्पएज इंडिया व तळवडे,रुपीनगर,सहयोगनगर प्रभाग १ मधील सर्व महिला भगिनींच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला,त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन वैशालीताई शांताराम (बाप्पू) भालेकर, शितलताई धनंजय वर्णेकर, अस्मिताताई अनिल भालेकर, लताताई किरण पाटील, स्मिताताई श्रीधर उत्तेकर, सरिताताई पांडुरंग भालेकर, आशाताई शांताराम भालेकर, सुरेखाताई रघुनंदन घुले यांच्या माध्यमातून करण्यात आला .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रूपाली वाळुंज यांनी केले, हेल्पएज इंडिया व फिजित्सु कंपनी यांच्या माध्यमातून या परिसरातील गरजू रुग्णांना औषधे वाटप केली जातात त्यामुळे परिसरातील रुग्णांना योग्य उपचार मिळाल्यामुळे ते समाधानी असल्याची माहिती दिली. यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती असलेल्या गायत्री जैन मॅडम यांनी फिरता दवाखाना कसा असतो, त्यात सुविधा कशी दिली जाते, मोफत औषधे कशी दिली जातात, रुग्णांची तपासणी कशी केली जाते, तसेच यात रुग्णांचे समुपदेशन केले जाते याबद्दल माहिती दिली. प्रियंका रोहम मॅडम यांनी MHU(Mobile HealthCare Unit) यातून दिल्या जाणाऱ्या सुविधाबद्दल माहिती दिली, व त्या सुविधा वाढविण्यात येतील अशी ग्वाही दिली.

डॉ.रजनी खुणे यांनी महिलांना आरोग्य विषयक माहिती देत असताना मासिक पाळी याबद्दल माहिती दिली, मासिक पाळी मध्ये वापरले जाणारे पॅड याचे विघटन कसे करावे याबद्दल महिलांना जागृक केले.
या कार्यक्रम प्रसंगी देहूरोड पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांनी महिलांसाठी जे कायदे व अधिकार असतात याची माहिती दिली या प्रसंगी कुठल्याही महिलेला व मुलींना असुरक्षित वाटल्यास मी तुमच्या सेवेसाठी 24 तास तत्पर आहे अशी ग्वाही दिली.

वैशालीताई शांताराम (बाप्पू) भालेकर यांनी महिलांना आरोग्य विषयक काळजी घेण्याबाबत सूचना दिल्या, महिलांनी आरोग्याच्या बाबतीत सक्षम होऊन आजची महिला आर्थिक दृष्ट्या सुद्धा सक्षम होण गरजेचं आहे अशा प्रकारचे मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे शांताराम (बाप्पू) भालेकर यांच्या सहकार्याने महिलांना शिवणयंत्र वाटप, विद्यार्थिनींना सायकल वाटप, महिलांसाठी बचत गटाची निर्मिती करणे बचत गटांना अनुदान मिळवून देणे अशाप्रकारच्या विविध लाभार्थी योजना राबविण्यासाठी मदत होते. शितलताई धनंजय वर्णेकर यांनी महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी स्वतःवर प्रेम केले पाहिजे व स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असा संदेश दिला.

सुनीताताई काळोखे यांनी बचत गटाविषयी महिलांना मार्गदर्शन केले त्यात त्यांनी महिलांना बचत गटामार्फत महिलांसाठी काही योजना राबविण्यात येतात याबद्दल सविस्तर माहिती दिली त्यामध्ये शांताराम बाप्पू भालेकर व वैशालीताई भालेकर यांच्या मार्गदर्शनाने बचत गटांना अनुदान, बचत गटातील महिलांसाठी कर्ज देणे व त्याची परतफेड करून घेणे बचत गट व्यवस्थित चालविणे यांचे मार्गदर्शन मिळते असे उदगार काढले.

गौरी चव्हाण यांनी जागतिक महिला दिनाची माहिती सांगत असताना त्यांनी सांगितले की ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रूटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली, दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या या दोन मागण्या बरोबरच स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांचा या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीचा स्मरणार्थ ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा असा ठराव क्लाराने मांडला व तो पास झाला. तेव्हापासून संपूर्ण जगात ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.

कल्याणीताई कमलेश भालेकर यांनी प्रत्येक महिलेला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई बहीण, मैत्रीण, मुलगी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून समाजामध्ये एक आदर्श निर्माण करण्याचा संदेश दिला. सौ.सरिताताई भालेकर, सौ.लताताई पाटील, सीमाताई उत्तेकर, सौ.आशाताई भालेकर यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रम प्रसंगी शांताराम बाप्पू यांनी एक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्री असते त्याचप्रमाणे एक यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे पुरुष असतो हे सांगत असताना एक त्यांनी दृष्टांत सांगितला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांचे उदाहरण देत असताना यशवंतराव मुंबईत असताना त्यांच्या बाबत काही मंडळी त्यांच्या गावाकडच्या घरी वेणूताई कडे गेले त्यावेळी वेणूताई घरामध्ये भाकरीचे पीठ मळून भाकरी करीत असताना यशवंतरावांना बाबत चुकीच्या गोष्टी सांगू लागले तेव्हा वेणूताई म्हणाल्या माझा नवरा खूप मोठ्या मनाचा माणूस आहे, त्यामुळे तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचला आहात मला चुकीचे मार्गदर्शन करू नका, माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे यावरूनच वेणूताईंचा यशवंतरावांवर असलेला विश्वासाचा मोठेपणा दिसून येतो.

त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सुविद्य पत्नी सौ. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची खूप मोठी चळवळ पुण्यामध्ये केली त्यामुळे आजची स्त्री खर्‍या अर्थाने शिक्षित होऊन पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुरुषाच्या सुद्धा एक पाऊल पुढे काम करते अशा प्रकारचे उदगार काढले. त्याचप्रमाणे सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनानिमित्ताने शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रम प्रसंगी फिजित्सू कंपनीच्या गायत्री जैन मॅडम त्याचप्रमाणे प्रियांका रोहम मॅडम डॉ.रजनी खुणे, रूपाली वाळुंज देहूरोड पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक वर्षाराणी पाटील मॅडम नंदा चंद्रकांत काळोखे मुख्याध्यापिका कै. किसनराव संतूजी भालेकर शाळा क्रमांक 98 तळवडे ,शितलताई पवार, पूजाताई भांगरे, रेखाताई शिंदे, सुषमाताई बाठे, रेशमाताई भालेकर, जयश्रीताई बाठे, वेणूताई चव्हाण, वनिताताई भालेकर, रुपालीताई मेमाने, सुप्रियाताई भालेकर ,सुलभाताई बोडके, विजयाताई भालेकर ,जिजाबाई भालेकर ,अलकाताई तळपे, अश्विनीताई कुटे, संगीताताई गोडसे ,पुष्पाताई खटावकर ,स्वातीताई कासार ,प्रतिभाताई शेजाळ, संगीताताई भालेकर ,ज्योतीताई परदेशी, कुसुमताई नागरगोजे ,विद्याताई मोरे, अनिताताई जगदाळे, सुलोचनाताई भोज ,अर्चनाताई चव्हाण, प्रियंकाताई भालेकर ,वर्षाताई सदानंद, ,शोभाताई तापकीर, सुमनताई अंकलकोटे रेखाताई पाटील, बोराटेताई, मंगलताई भालेकर, शर्मिलाताई भालेकर,रेखाताई भालेकर ,रूपालीताई भालेकर ,सारिकाताई भालेकर ,अंजलीताई गायकवाड ,प्राजक्ताताई भालेकर ,लताताई कोकणे ,संगीताताई शिंदे ,कविताताई शिंदे
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने संगीत खुर्ची व लिंबू चमचा या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, या स्पर्धांचे सूत्रसंचालन सौ.गौरी चव्हाण व आशिष मालुसरे यांनी केले तसेच विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.

संगीत खुर्ची स्पर्धा विजेते
प्रथम क्रमांक:- सरिताताई भालेकर
दुतिय क्रमांक:- प्रियांकाताई भालेकर
तृतीय क्रमांक:- सारिकाताई जाधव
लिंबू चमचा स्पर्धा विजेते
प्रथम क्रमांक:- वैशालीताई पिंड
द्वितीय क्रमांक:- अंकिताताई जगदाळे
तृतीय क्रमांक:- भाग्यश्रीताई अहिरे
तसेच जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला भगिनींना हैजेनिक किट व टी ट्रे चे वाटप करण्यात आले.
अस्मिताताई भालेकर यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani