प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये जागतिक जेष्ठ नागरिक दिन कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी।लोकवार्ता-
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये जागतिक जेष्ठ नागरिक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, महिला व बालकल्याण समिती सभापती सविता खुळे, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, शर्मिला बाबर, अतिरीक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उप आयुक्त अजय चारठाणकर, जेष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
