लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

तालिबानच्या आक्रमकतेमागे पाकिस्तान, चीन, रशिया?

तालिबान सरकारसोबत जुळवून घेण्याबाबत दाखविली तत्परता

लोकवार्ता । प्रतिनिधी

कट्टरवाद्यांसमोर गेली सुमारे २० वर्षे तग धरलेला अफगाणिस्तान अवघ्या २० दिवसांत तालिबान्यांच्या ताब्यात गेला. अमेरिकेच्या उपस्थितीमुळे काहीशी जायबंदी झालेली ही दहशतवादी संघटना अमेरिकन सैन्य परतीच्या मार्गावर असतानाच अचानक इतकी आक्रमक होण्यामागे रशिया, चीन तसेच पाकिस्तानची फूस कारणीभूत असल्याचा आरोप जाणकारांमधून होत आहे. नव्या तालिबान सरकारसोबत जुळवून घेण्याबाबत पाकिस्तान, चीनने तत्परतेने दर्शविलेली तयारी याकडेच अंगुलीनिर्देश करते.

चीन, रशिया आधीपासूनच मध्य आशियात आपले आर्थिक हित साधण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशात अफगाणिस्तानमध्ये भारताचा वाढता प्रभावही पाकिस्तानच्या डोळ्यात खुपत होता. त्यामुळे अशी शंका उपस्थित होण्याला वाव निर्माण झाला आहे.

अमेरिकेने सैन्य माघारीची घोषणा करताच विविध देशांनी अफगाणिस्तानातून आपला गाशा गुंडाळायला सुरुवात केली होती. मात्र, चीन आणि पाकिस्तानने तातडीने तालिबानशी नव्याने संबंध प्रस्थापित करण्याची घोषणा करुन आपला रंग जगाला दाखवून दिला.

पाकिस्तानचा दुहेरी फायदा
पाकिस्तान तालिबानद्वारे अफगाणिस्तानात आपला दबदबा निर्माण करु पाहत आहे. यामागे पाकिस्तानचा दुहेरी फायदा आहे. एक म्हणजे अफगाणिस्तानात तालिबान सरकार आल्यास दहशतवाद्यांशी असलेल्या हितसंबंधामुळे पाकिस्तानला मोठा फायदा संभवतो. म्हणजे मध्य आशियातील प्रमुख मार्गांवर नियंत्रण. याद्वारे भारताची कोंडी करण्याचा पाकिस्तानचा डाव आहे. अफगाणिस्तानातील विकास कामांमुळे भारताचा प्रभाव बऱ्यापैकी वाढला असून त्याचे शल्य पाकिस्तानला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani