Palkhi Sohala 2022 : पालखी प्रस्थान काळात आळंदीत वाहनांना प्रवेश बंदी
लोकवार्ता : आळंदी शहरात पालखी प्रस्थान काळात वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. रविवार(दि. १९) ते बुधवार (दि. २२) या काळात शहरात वाहनांचा प्रवेश बंद करण्यात आल्याची माहिती आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जानेश्वर साबळे यांनी दिली.

या काळात वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन साबळे यांनी केले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी पोलिस प्रशासनाने नियोजन केले आहे.
पुणे – नाशिक रस्ता, देहूफाटा ते मोशी रस्ता, चऱ्होली धानोरे बायपास रस्ता, मरकळ – कोयाळी रस्ता, पुणे-नगर रस्ता या पर्यायी मार्गांचा वापर करता येणार आहे. या काळात केवळ पासधारक दिंड्यांच्या वाहनांना आळंदीत प्रवेश देण्यात देणार आहे. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शुक्रवारी आळंदित बंदोबस्ताचा आढावा घेतला आहे. पालखी मार्गावर दुकाने लावण्यास बंद घालण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी जवळजवळ २ हजार पोलीस तैनात असून यात दोन पोलीस आयुक्त, सात सहाय्यक उपयुक्त, ४२ निरीक्षक, १८० उपनिरीक्षक, उपनिरीक्षक, अकराशेअंमलदार,
दोनशे वाहतूक पोलिस, ३५ वार्डन, सहाशे होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलाचे एक पथक, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची दोन पथके, बॉम्बशोधक व निवारक विभागाची दोन पथके असा बंदोबस्त असणार आहे.