यंदा पालखी सोहळ्यात पंधरा लाख भाविक; अजितदादांनी दिली माहिती
यंदाच्या पालखी सोहळ्यात जवळ जवळ पंधरा लाख भाविक येण्याची शक्यता असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. गेली दोन वर्ष कोरोनामुळे वारी सोहळ्यात खंड पडला होता. यंदा मात्र पालखी सोहळा मोठ्या गर्दीने साजरा होणार आहे.

लोकवार्ता : यंदाच्या पालखी सोहळ्यात जवळ जवळ पंधरा लाख भाविक येण्याची शक्यता असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. गेली दोन वर्ष कोरोनामुळे वारी सोहळ्यात खंड पडला होता. यंदा मात्र पालखी सोहळा मोठ्या गर्दीने साजरा होणार आहे.
रविवारी पुण्यातील कॉन्सिल हॉल येथे उपमुख्यामंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत वारी नियोजनाबद्दल बैठक पार पडली. यावेळी पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालख्यांच्या प्रस्थानाचे नियोजन करण्यात आले आहे. वारीची सर्व तयारी झाली असून यावर्षी जवळजवळ १५ लाख वारकरी येण्याची शक्यता आहे. यावेळी पालखी मार्गावर कोण कोणत्या सोयी उपलब्ध करून देण्यात आले आहे याची माहिती अजित पवार यांनी दिली.
या बैठकीत सोलापूर आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच आळंदी देहू आणि पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष उपस्थित होते.