पंकजा समर्थकांनी घेतली आक्रमक भूमिका
लोकवार्ता : येत्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्याचं टाळलं आहे. याच पार्श्वभूमीवर पंकजा समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली असून औरंगाबादमधील भाजप कार्यालयसमोर आंदोलन करण्यात आले.
भाजपने बुधवारी विधान परिषद निवडणुकीत पाच उमेदवारांची नाव घोषित केली. या यादीत पंकजा मुंडेंना जागा देण्यात आली नाही. विधपरिषदेत जागा मिळाल्यास मी चांगलं काम करून दाखवले, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं होत. मात्र पंकजा मुंडे यांना वगळून त्या ठिकाणी इतर पक्षातून भाजपवापसी झालेल्या उमेदवारांना विश्वास दाखवण्यात आला. याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून विविध शहरांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. औरंगाबाद येथील पंकजा समर्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. भाजप कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

भाजपकडून वेळोवेळो डावलण्यात आल्यानं पंकजा मुंडे बंड करणार का? अशी चर्चा राजकीय पातळीवर चालू आहे. मात्र मुंडे त्यांनीं कोणतीही प्रतिक्रिया देण्याचं टाळलं असून त्या दोन दिवसांनी या सर्व घडामोडीवर भाष्य करतील, असं सांगितलं जात आहे.
pimapri chinchwad : CNG दारात दोन रुपयांची वाढ