Pandharpur wari २०२२ : आज सासवड मध्ये पालखी मुक्काम
लोकवार्ता: कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी वारी सोहळा होत आहे. विठुरायाच्या नामघोषत लाखो भक्तांच्या गर्दीत हा सोहळा पार पडत आहे. आज पालखी सोहळ्याचा मुक्काम सासवड येथे असेल.

वारीतल्या सर्व भक्तांना आता विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. यंदाच्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी जवळपास चार लाख भाविक आळंदी येथे दाखल झाले होते. २१ तारखेला ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात माउलींच्या पालखीचे प्रस्थान झाले. परंपरेनुसार सोहळ्याचा पहिला मुक्काम गांधीवाड्यात झाला.
विविध अभंगांसह मृदूंगावर प्रत्येकजण विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झाला. दोन्ही पालख्यांच्या दिंड्या संगमवाडी पुलावर विलीन होऊ झाल्या. पालखी मार्गस्थ होत असताना कुतूहलाने रस्त्याच्या दुतर्फा स्थानिक नागरिक जमले. काही संस्थांनी भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी मंडपाची व्यवस्था केली होती. त्यानंतर 22 आणि 23 तारखेला पुण्यात मुक्काम केला. आज सासवड येथे पालखीचा मुक्काम असेल. सासवड येथील ग्रामस्थ पालखीची आतुरतेने वाट पाहत आहे. या सोहळ्याच्या काळात नगरपालिकेची आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, विद्युत सुविधा व स्वच्छतेची तयारी पूर्ण झाली आहे.