ट्विटरच्या माध्यमातून या नेत्यांनी केल्या वारीबद्दल भावना व्यक्त
काल संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्या पुणे नगरीमध्ये दाखल झाल्या होत्या यावेळी पुणेकरांनी मोठ्या उत्साहात पालखीचं स्वागत करत दर्शन घेतले. सामान्यांसोबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
यावेळी ट्विटरच्या माध्यमातून या नेत्यांनी ट्विट केलं आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ”संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी रथात माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. रथात दर्शन घेण्याची आणि माऊलींच्या पादुकांजवळ काही वेळ घालवण्याची अविस्मरणीय अनुभुती अनुभवायला मिळाली, हे माझं भाग्यच समजतो.” असं ट्विट केलं आहे.

तर संभाजीराजे छत्रपती यांनी ”वारी महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैशिष्ट आहे. शेकडो वर्षाची ही महाराष्ट्राची परंपरा अखंड पणे चालू आहे. असंख्य लोक वारीला जातात. वारीला जाणे म्हणजे ‘ आनंदाचे डोही आनंद तरंग. भक्त आणि देव यांच्या एकत्र येण्याचा हा वारीचा मार्ग म्हणजे परमेश्वराशी एकरूप होण्याचा मार्ग.” असं ट्विट याप्रसंगी केलं आहे.