लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

पाच महिन्यांच्या तानुल्यासह वारीत रांगोळी काढून या महिलेन बजावली सेवा

वारीत सेवा करणं म्हणजे पुण्याईच काम असं समजलं जातं. कोणी अन्नदान करत तर कोणी वेगवेगळ्या माध्यमातून सेवा देण्याचा प्रयत्न करत. गेले आकरा वर्षपासून वारीत सुंदर रांगोळी काढण्याचं काम राजश्री भागवत करत आहेत. मात्र यंदाचं वर्षी त्या आपल्या ५ महिन्याच्या चिमुकल्याला सोबत घेऊन रांगोळी काढणार आहेत.. आपल्या रांगोळीच्या माध्यमातून त्या समाज प्रबोधनाचा संदेश देतात… कोरोनानंतर यंदाच्या वर्षी पंढरपूरपर्यंत रांगोळी काढण्यासाठी तब्बल ८५ पोती पांढरी रांगोळी आणि ४०० किलो रंग लागले असल्याचं त्यांनी सांगितलं.

आळंदीपासून पंढरपूरपर्यंत रांगोळीच्या पायघड्या घालून पांडुरंगाची सेवा करण्याचं काम या करत आहेत. आफ्रिकेतील मादागास्करमधून आमंत्रण आलेलं असताना ‘मला ज्या माऊलीन ओळख दिली, त्या माऊलीची सेवा मी नाही सोडू शकत. त्यामुळे मी पालखी सोहळ्यात सहभागी होऊन सेवा बजावणार आहे, असं अभिमानाने त्यांनी सांगितलं.

हि रांगोळी कधी ना कधी पुसली जाणार हे माहित असताना त्या रांगोळी काढतात… याबाबत त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना उत्तर दिल कि अनेक वारकरी येथून जातात तेव्हा त्यांचा पदस्पर्श या रांगोळीला होतो. त्यामुळे साक्षात माऊलींचे पाय माझ्या रांगोळीला लागतात… माझी सेवा प्रत्यक्ष माऊलींपर्यंत पोहोचते. त्यामुळे दरवर्षी मी हि सेवा मोठ्या आनंदात करते.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani