”ज्येष्ठ नागरिकांना मोफत पंढरपूर दर्शन घडवणार…” -सामाजिक कार्यकर्ते विनायक आबा मोरे
Lokvarta: टाळगाव चिखली परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत पंढरपूर दर्शन घडवण्यात येणार आहे. या यात्रेसाठी सुमारे १ हजार २०० यात्रेकरूंनी नाव नोंदणी केली आहे,अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते विनायक आबा मोरे यांनी दिली. ज्येष्ठ नागरिकांना या यात्रेमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे.

सामाजिक कार्यकर्ते विनायक आबा मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत पंढरपूर दर्शन यात्रेचे नियोजन करण्यात आले. उद्या दि. २ जून २०२२ रोजी यात्रा निघणार आहे. त्यासाठी नावनोंदणी करण्यात आली होती. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. विनायक मारे जनसंपर्क कार्यलय शॉप नं. १८, गोकुळम हौसिंग सोसायटी, पाटील नगर चिखली येथे नागरिकांनी नाव नोंदणी केली असून, यात्रेत सहभागी होणाऱ्या यात्रेकरूसाठी मतदान कार्ड, कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
विनायक आबा मोरे म्हणाले की, कोविडमुळे गेल्या दोन वर्षात मंदिरे बंद होती. त्यामुळे आता परिस्थिती नियंत्रणात आल्याने मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे पांडूरंगाचे दर्शन व्हावे, असा आमचा संकल्प होता. त्या पार्श्वभूमीवर यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम हाती घेतला आहे.