पाणी उकळून प्या; पुणे महापालिकेचा आवाहन
लोकवार्ता : पाणी उकळून प्या असं आवाहन पुणे महापालिकेनं नागरिकांना केलं आहे. पुणे शहराला खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव धरणातून पाणीसाठा उपलब्ध आहे.

शहरात येणार पाणी या जलसाठ्यातून येत. हे पाणी महापालिकेकडून प्रक्रिया करून सोडलं जात. पण नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची खबरदारी घ्यावी यासाठी महापालिकेने पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले आहे.
मुसळधार पावसामुळे गढूळ पाणी वाहते. त्यामुळे डेंग्यू, मलेरियासोबत डायरिया यासारख्या आजारांना नागरिकांनी बळी पडू नये यासाठी महापालिकेने आवाहन केले आहे. नाली, डबकी यात पाणी साचून त्याद्वारे अनेक रोग वाढण्याची शक्यता आहे. तसेच पाणी फिल्टर होऊन येत असले तरीही नागरिकांनी सतर्क राहून या पावसात आरोग्याची काळजी घ्यावी.
या पावसाळ्यात निरोगी रहायचं असेल तर पाणी उकळून पिणं गरजेचं आहे. जुलाब, गॅस्ट्रो, विषाणू, उलटी, जंतूंची वाढ, पोटदुखी असे अनेक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन महापालिकेने केले आहे.